जेव्हा 500 रुपयांसाठी नेहाने केला होता अभिनय

आपल्या बोल्ड अंदाजामुळे नेहमीच चर्चेत असणारी अभिनेत्री म्हणजे नेहा पेंडसे. 

नेहा 'मे आई कम इन मॅडम' या टीव्ही शोमधून चांगलीच चर्चेत आली.

नेहाला खरी प्रसिद्धी 'बिग बॉस 12'मुळे मिळाली. 

नेहाने अभिनयाची सुरुवात मात्र वयाच्या 10 व्या वर्षीच केली होती. 

नेहाने 10 वर्षाची असताना एका मराठी चित्रपटात काम केलं होतं. यासाठी तिला 500 रुपये मिळाले होते. 

हे 500 रुपये नेहाने तिच्या आई-वडिलांना दिले होते. 

नेहाने आत्तापर्यंत 25 पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये काम केलं आहे. 

नेहाने आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं असं स्थान निर्माण केलं आहे.

नेहा कायमच तिच्या वेगवेगळ्या लुकमुळे चर्चेत येत असते.