अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरने घेतला श्रीकृष्ण अवतार!

आज श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरने आगळ्या वेगळ्या शुभेच्छा दिल्या आहेत.

अपूर्वा नेमळेकरने श्रीकृष्ण अवतार घेतला आहे.

या श्रीकृष्ण अवतारात अपूर्वा खूपच मनमोहक दिसत आहे.

श्रीकृष्ण अवतारात या फोटोंमध्ये अपूर्वा अजिबात ओळखू येत नाहीये.

तिने तिचे श्रीकृष्ण रूपातील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

याआधीही तिने नवरात्रात देवीचे असेच फोटोशूट केले होते.

तिने संपूर्ण देवीचे रूप घेतले होते.

चाहते तिच्या  या उपक्रमांना  भरभरून प्रतिसाद देतात.

शेवंताच्या भूमिकेमुळे अपूर्वाला खूपच प्रसिद्धी मिळाली होती.