अमृता पुन्हा बनली 'चंद्रमुखी'...!

अभिनेत्री अमृता खानविलकर सध्या झलक दिखला जो या शोमध्ये सहभागी झाली आहे. 

शोमध्ये अमृता दिवसेंदिवस प्रेक्षकांचा उत्साह वाढवत आहे. 

महाराष्ट्राची लाडकी चंद्रमुखी आता हिंदी शोमध्येही तिच्या अदांनी घायाळ करत आहे. 

अमृता पुन्हा एकदा चंद्रमुखी बनली आहे. 

पण ही चंद्रमुखी दौलतरावांची नसून बॉलिवूडच्या देवदासची आहे. 

झलक दिखला जाच्या लेटेस्ट एपिसोडमध्ये अमृता 'डोलारे' या  गाण्यावर परफॉर्मन्स करणार आहे. 

नृत्यदिग्दर्शक आशिष पाटीलबरोबर अमृता थिरकताना दिसणार आहे. 

आशिष अमृताची जोडी पुन्हा एकदा टेलिव्हिजनवर पाहायला मिळणार आहे. 

अमृताची ही चंद्रमुखी तुम्हाला कशी वाटली?