अभिनेत्री भुमीजा पाटील होणार दुबईची सून!
'फुलाला सुगंध मातीचा' या मालिकेतील जान्हवी म्हणजेच अभिनेत्री भूमिजा पाटील आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे.
अभिनेत्रीच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे.
भूमिजा पाटीलने नुकतंच साखरपुडा उरकला आहे.
भूमिजा पाटीलने जिम ट्रेनर परागसोबत साखरपुडा केला आहे.
भूमिजा आणि परागन अगदी शाही थाटात आपला साखरपुडा पार पाडला.
भूमिजाचा होणारा नवरा पराग हा दुबई स्थित आहे.
त्यामुळे भूमिजा आता दुबईची सून होणार आहे.
हे दोघे गेल्या बऱ्याच दिवसंपासून एकमेकांना ओळखतात.
या दोघांवर सध्या शुभेच्छाचा वर्षाव केला जात आहे.