'सैराट' चित्रपटामुळे एका रात्रीत स्टार बनलेली अभिनेत्री म्हणजे रिंकू राजगुरु.

रिंकू मुळची सोलापूरची. 3 जून 2001 रोजी तिचा जन्म झाला. 

सैराटसाठी रिंकूची निवड झाली तेव्हा ती हायस्कूलमध्ये होती. 

सैराट चित्रपट इतका लोकप्रिय ठरला की 15 वर्षांची रिंकू रातोरात स्टार बनली.

रिंकूच्या पहिल्याच चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. रिंकूच्या अभिनयाचंही कौतुक झालं.

यानंतर रिंकूकडे अनेक प्रोजेक्ट आले. ती हिंदी वेबस्टोरीमध्येही झळकली. 

याशिवाय रिंकूने बॉलिवूडमध्येही पदार्पण केलं. 

पहिल्याच चित्रपटात रिंकू महानायक अमिताभ बच्चन यांच्यासोबत दिसली.

रिंकू सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.

सोशल मीडियावर फोटो, व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांसोबत कनेक्ट राहते.