प्रत्येक व्यक्तीची ओळख त्याच्या नावावरून आणि कर्मावरून होत असते. नाव ही माणसाची खास ओळख असते
बाळाचं नाव काय ठेवावं यासाठी अलिकडे पालक फार विचार करतात.
धार्मिक श्रद्धा असलेले बहुतांशी लोक एखाद्या देवाच्या नावावरून आधुनिक नाव ठेवण्याचा प्रयत्न करतात.
जर तुम्हीही तुमच्या मुलासाठी एखादं नवीन नाव शोधत असाल तर तुम्ही भगवान रामाच्या या नावांचा विचार करू शकता.
अविराज: अविराज हे भगवान रामाच्या अनेक नावांपैकी एक आहे. बाळाचे नाव तुम्ही असे ठेवू शकता.
मानविक: हे भगवान रामाचे एक नाव आहे. तुम्ही तुमच्या मुलाचे नाव मानविक ठेवू शकता.
विराज: विराज हे प्रभू रामाच्या अनेक नावांपैकी एक आहे.भगवान राम हे सूर्यवंशी होते, या नावाचा अर्थही तोच आहे.
शाश्वत: सनातन धर्माचे दुसरे नाव शाश्वत आहे आणि हे राजारामाचेही नाव आहे. हे नाव जेवढे अद्वितीय आहे तेवढेच त्यात वेगळेपण आहे.
अद्वैत: अद्वैत हे भगवान रामाचे नाव आहे. या नावाचा अर्थ अविश्वसनीय आहे किंवा त्याच्यासारखा कोणीही नाही.
अथर्व: चार वेदांपैकी एक अथर्व आहे आणि ते भगवान रामाचे नाव देखील आहे. या नावाचा अर्थ वेदांचा जाणता, असे आहे.
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)