पुणेकरांचा कौल कोणाला? 

पुण्यातील बहुचर्चित कसबा पेठ पोटनिवडणुकीचं मतदान रविवारी पार पडलं.

काँग्रेसचे रवींद्र धंगेकर विरुद्ध भाजपचे हेमंत रासने अशी थेट लढत असलेल्या या निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढल्याचं पाहायला मिळत आहे.

कसबा पेठ पोटनिवडणुकीत अचानक मतदान वाढल्यामुळे चुरस वाढली आहे

कसबा पोटनिवडणूक भाजप आणि महाविकास आघाडीने सुरुवातीपासूनच प्रतिष्ठेची बनवली

त्यामुळे पोटनिवडणूक असूनही दोन्ही पक्षातील दिग्गज नेत्यांनी पुण्यात तळ ठोकला होता. 

या निवडणुकीमध्ये पैसे वाटल्याचा आरोपही भाजपवर करण्यात आला

 मविआने धंगेकरांचा जनसंपर्क आणि नेत्यांच्या प्रचारसभेद्वारे प्रचार केला. तर भाजपने मायक्रो लेव्हलला नियोजन केले होते

आता कसब्याच्या मतदारांचा कौल मतदान यंत्रात कैद झाला आहे.

 शेवटच्या सत्रात वाढलेल्या मतदानाच्या टक्क्यामुळे कसब्यात कोण बाजी मारणार याबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.