आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दोन देशांकडून खेळलेले खेळाडू आपण पाहणार आहोत

टीम डेव्हिड... सिंगापूरमध्ये जन्मलेला डेव्हिड आधी याच देशाकडून खेळला

पण आता डेव्हिड ऑस्ट्रेलिकडून खेळत आहे. त्याच्याकडे दोन्ही देशांचं नागरिकत्व आहे.

डेव्हिड व्हिसे... डेव्हिडनं दक्षिण आफ्रिकेकडून क्रिकेटमध्ये पदार्पण केलं

पण आता डेव्हिड व्हिसे नामिबिया संघाकडून खेळत आहे.

वॅन डर मर्वे. हाही दक्षिण आफ्रिकनऑल राऊंडर. द. आफ्रिकेकडून तो 13 आंतरराष्ट्रीय सामने खेळला.

पण काही वर्षांनी मर्वेनं आपला मोर्चा नेदरलँडकडे वळवला. आगमी वर्ल्ड कप मध्ये तो याच संघाकडून खेळणार आहे.

मायकल रिपनने 2013 साली नेदरलँडकडून पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळला

2022 साली रिपन न्यूझीलंड संघात सामील झाला. 19 मॅचमध्ये त्यानं 26 विकेट्स घेतल्या आहेत.

डर्क नॅनेस हे नाव तुम्हाला माहितच असेल... नॅनेसनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटची सुरुवात नेदरलँडकडून केली

पण काही वर्षांनी नॅनेस ऑस्ट्रेलियन टीमचा आघाडीचा गोलंदाज बनला.