जगातली पहिली ऑटो-बॅलन्सिंग स्कूटर 

लायगर मोबिलिटी या स्टार्टअपने जगातली पहिली ऑटो-बॅलन्सिंग इलेक्ट्रिक स्कूटर तयार केली आहे.

ही इलेक्ट्रिक स्कूटर ऑटो एक्स्पो 2023 मध्ये सादर करण्यात आली होती.

मुंबईस्थित  स्टार्टअपने बनवलेल्या या ऑटो-बॅलन्सिंग स्कूटरने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. 

विशेष म्हणजे ही स्कूटर पूर्णतः भारतीय बनावटीची आहे.

यातलं ऑटो बॅलन्सिंग फीचर चर्चेचा विषय ठरलं आहे. याशिवाय स्कूटरमध्ये आणखी काही खास फीचर्स आहेत.

या इलेक्ट्रिक स्कूटरचे लायगर एक्स आणि लायगर एक्स प्लस असे दोन व्हॅरिएंट्स लाँच होणार आहेत.

ही स्कूटर सिंगल चार्जमध्ये 60 कि.मी पर्यंत धावेल तर एक्स प्लस ही 1OO कि.मी पर्यंत धावू शकते. 

एक्सची किंमत 90 हजार रुपये एवढी आहे, तर  एक्स प्लसची किंमत 97 हजार रुपये एवढी आहे.

जूनपासून दोन्ही गाड्यांच्या बुकिंगला सुरुवात होणार आहे.