मराठी बातम्या /बातम्या /Viral /

Shocking! तो घास तोंडात घेणार तोच...; 'मसालेदार चिली'तून शीर नसलेल्या बेडकाने मारली उडी

Shocking! तो घास तोंडात घेणार तोच...; 'मसालेदार चिली'तून शीर नसलेल्या बेडकाने मारली उडी

शिजलेल्या पदार्थातून शीर नसलेल्या बेडूक उड्या मारत बाहेर पडला.

शिजलेल्या पदार्थातून शीर नसलेल्या बेडूक उड्या मारत बाहेर पडला.

शिजलेल्या पदार्थातून शीर नसलेल्या बेडूक उड्या मारत बाहेर पडला.

  • Published by:  Priya Lad

बीजिंग, 14 मे : खाद्यपदार्थांमध्ये उंदीर, पाल, झुरळं सापडल्याची काही प्रकरणं तुम्हाला माहिती असतील. पण सध्या सोशल मीडियावर अशा खाद्यपदार्थाची चर्चा आहे, ज्यात चक्क शीर नसलेलं बेडुक आहे, तेसुद्धा जिवंत. या पदार्थाचा व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. जो पाहून सर्वजण शॉक झाले आहे (Frog alive in food).

चीनच्या सिचुआन प्रांतातील एका रेस्टॉरंटमधील हा व्हिडीओ आहे. हे रेस्टॉरंट चेंगडु शहरात असल्याचं सांगितलं जातं आहे. या रेस्टॉरंटमध्ये आलेल्या एका ग्राहकाने बुलडॉग फ्रॉग  चिली ऑर्डर केलं. आता नाव वाचूनच तुम्हाला समजलं असेल, या पदार्थात बेडुक पडला नव्हता तर ही डिशच बेडकाची आहे. बुलडॉग फ्रॉग चिली या रेस्टॉरंटमधील खास आणि या भागातील फेमस डिश आहे. ज्यात बेडकाचं डोकं कापून त्याला लाल मिरची, काळी मिरीत मॅरीनेट करून शिजवलं जातं.

हे वाचा - Oh no! खाणं भरवताना भल्यामोठ्या माशाने व्यक्तीचा हातही खाल्ला; अंगावर काटा आणणारा VIDEO

या रेस्टॉरंटमध्ये ही विचित्र डिश ऑर्डर करणारा ग्राहक या रेस्टॉरंटचा रेग्युलर कस्टमर आहे. त्याला ही डिश सर्व्ह करण्यात आली.  तो चमच्याने खाणार तोच अचानक बेडुकाने ताटातून बाहेर टेबलावर उडी मारली. डोकं कापलेला हा बेडून ताटातून बाहेर पडला. टेबलावर उड्या मारू लागला.

डोयिन या चिनी सोशल मीडियावर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. जो इतर सोशल मीडियावरही व्हायरल होतो आहे. व्हिडीओ आणि फोटोत तुम्ही पाहू शकता बेडकाचं डोकं दिसत नाही आहे. डोकं कापलेलं आहेत. त्याचे हातपाय हलताना दिसत आहेत. हा व्हिडीओ पाहून लोकांना शॉक बसला आहे. अनेकांना किळसही वाटतो आहे.

हे वाचा - 'Gutkha खा पुरस्कार मिळवा', IAS Officer ची Twitter Post सोशल मीडियावर चर्चेत

चीन हा विचित्र खाद्यपदार्थांसाठीही ओळखला जातो. इथं इतक्या विचित्र डिश बनवल्या जातात, खाल्ल्या जातात जे ऐकून, पाहूनच उलटी येते आणि किळस वाटतो. असाच हा पदार्थ आहे. ज्यावर बहुतेक नेटिझन्सनी संताप व्यक्त केला आहे.

First published:

Tags: Other animal, Shocking news, Viral, Viral news