मराठी बातम्या /बातम्या /Viral /'त्या' झोमॅटो डिलिव्हरी बॉयसाठी हैदराबादकर सरसावले, देणार सर्वात मौल्यवान भेट

'त्या' झोमॅटो डिलिव्हरी बॉयसाठी हैदराबादकर सरसावले, देणार सर्वात मौल्यवान भेट

zomato

zomato

तुमची ऑर्डर नऊ किलोमीटरवरून आली आहे आणि ती घेऊन येणारा डिलिव्हरी बॉय ती ऑर्डर सायकलवरून (Bicycle) घेऊन आला आहे, हे कळल्यावर तुम्हाला आश्चर्य नक्कीच वाटेल!

हैदराबाद, 18 जून: तुम्ही रात्री उशिरा झोमॅटोवरून (Zomato) एखाद्या पदार्थाची ऑर्डर केली आहे आणि ती ऑर्डर तुम्हाला अवघ्या 20 मिनिटांत आणि गरमागरम मिळाली, तर तुम्ही निश्चितच खूश व्हाल ना! पण, तुमची ऑर्डर नऊ किलोमीटरवरून आली आहे आणि ती घेऊन येणारा डिलिव्हरी बॉय ती ऑर्डर सायकलवरून (Bicycle) घेऊन आला आहे, हे कळल्यावर तुम्हाला आश्चर्य नक्कीच वाटेल! मग तुम्ही त्या डिलिव्हरी बॉयचं (Delivery Boy) नक्कीच कौतुक कराल ना! हैदराबादमधल्या (Hyderabad) एका व्यक्तीला एका डिलिव्हरी बॉयबद्दल असा अनुभव आला तेव्हा ती व्यक्ती केवळ त्याचं कौतुक करून थांबली नाही, तर त्यांनी फंडरेझर (Fundraiser) तयार करून लोकांकडून पैसे उभारून त्या डिलिव्हरी बॉयसाठी बाइक (Bike) खरेदी केली. आता लवकरच ती बाइक त्या डिलिव्हरी बॉयला दिली जाणार आहे. 'दी न्यूज मिनिट'ने याबद्दलचं वृत्त दिलं आहे.

हैदराबादच्या किंग कोटी परिसरात राहणाऱ्या रॉबिन मुकेश (Robin Mukesh) यांनी 14 जूनला रात्री साडेदहाच्या सुमारास झोमॅटोवरून ऑर्डर केली. मोहम्मद अकील अहमद (Mohd. Aqueel Ahmed) नावाच्या डिलिव्हरी बॉयला ती ऑर्डर अलॉट झाली. अवघ्या 20 मिनिटांत ती ऑर्डर पोहोचलीही. ऑर्डर घ्यायला रॉबिन गेले त्या वेळी त्यांना आश्चर्याचा धक्का बसला. कारण मोहम्मदने सायकलवरून 9 किलोमीटरचं अंतर 20 मिनिटांत कापून गरमागरम ऑर्डर पोहोच केली होती. त्यांनी त्याचं कौतुक केलं.

हेही वाचा- भारतावर सायबर हल्ले? चीन गोळा करतायेत 'ही' महत्त्वपूर्ण माहिती

रॉबिन मुकेश हे दी ग्रेट हैदराबाद फूड अँड ट्रॅव्हल क्लब या फेसबूक फूडीज ग्रुपचे अॅक्टिव्ह मेंबर. त्यांनी मोहम्मदबद्दलची पोस्ट फेसबुकवर शेअर केली. लोकांनी त्यावर खूप चांगल्या प्रतिक्रिया व्यक्त करायला सुरुवात केली. त्यानंतर रॉबिन यांनी फंडरेझर चालवून पैसे उभे करून मोहम्मदला बाइक मिळवून द्यायचं ठरवलं. 15 जूनला फंडरेझर सुरू केल्यानंतर अवघ्या 10 तासांत 60 हजार रुपये जमा झाले. फंडरेझर थांबवेपर्यंत 73,370 रुपये गोळा झाले.

या पैशांतून त्यांनी 65 हजार रुपये किमतीची टीव्हीएस एक्सएल बाइक (TVS XL Bike) बुक केली आहे. एक-दोन दिवसांत ती बाइक मोहम्मदला दिली जाणार आहे. तसंच, हेल्मेट, रेनकोट वगैरे गोष्टीही त्याला देण्यात येणार आहेत. उर्वरित रक्कम त्याच्या कॉलेजच्या फीसाठी दिली जाणार आहे, अशी माहिती रॉबिन यांनी दिली.

21 वर्षांचा मोहम्मद इंजिनीअरिंगच्या तिसऱ्या वर्षात शिकतो. गेल्या वर्षभराहून अधिक काळ तो झोमॅटोत काम करतोय. आपल्या बिकट आर्थिक परिस्थितीमुळे आपल्याला काम करावं लागतंय आणि सायकलवरून काम करता करता सवय झाल्यामुळे आपण वेगाने डिलिव्हरी करू शकतो, असं मोहम्मद सांगतो.

आपल्यासाठी लोकांनी पैसे उभारून बाइक खरेदी केली आहे, हे कळल्यावर तो भावुक झाला. यापूर्वीही कोणी तरी मदत करण्याचं जाहीर केलं होतं; मात्र ती मदत मिळालीच नाही, अशी एक कटू आठवणही त्याने सांगितली. या वेळी तसं होणार नाही, असा विश्वास त्याला आहे.

आपण प्रामाणिकपणे आपलं काम करत राहिलं, तर त्याचं चांगलं फळ आपल्याला नक्कीच मिळतं, याचं हे मूर्तिमंत उदाहरण आहे.

First published:

Tags: Hyderabad, Zomato