Home /News /viral /

सिंहाने हल्ला करताच चवताळला झेब्रा; जंगलाच्या राजालाच घडवली अद्दल, पाहा Shocking Video

सिंहाने हल्ला करताच चवताळला झेब्रा; जंगलाच्या राजालाच घडवली अद्दल, पाहा Shocking Video

व्हायरल व्हिडिओमध्ये दिसतं की जंगलात शिकारीच्या शोधात असेलला सिंह झेब्र्याजवळ पोहोचतो. झेब्र्याला काही कळायच्या आतच सिंह त्याच्यावर हल्ला करतो.

    नवी दिल्ली 01 डिसेंबर : जंगलात फक्त माणूसच नाही तर प्राणीही सुरक्षित नसतात. प्रत्येक क्षणी त्यांच्या डोक्यावर मृत्यूचा धोका असतो. जंगलात एक प्राणी नेहमीच दुसऱ्या प्राण्याच्या शिकारीच्या तयारीत असतो. मात्र, अनेकदा शिकार करण्याच्या तयारीत असलेलाच समोरच्याची शिकार बनतो. अनेकदा आपला जीव वाचवण्यासाठी लहान प्राणीही शिकारी प्राण्यांसोबत भिडताना दिसतात. सध्या असाच एक व्हिडिओ व्हायरल (Viral Video of Wild Animals) होत आहे. या व्हिडिओमध्ये एक सिंह एका झेब्र्यावर हल्ला (Lion Attacked on Zebra) करताना दिसतो. यानंतर झेब्र्याला राग आला आणि तो थेट जंगलाच्या राज्यासोबतच भिडला. हा व्हिडिओ पाहून तुम्हीही म्हणाल की जेव्हा आपला जीव संकटात येतो तेव्हा कमजोरही शक्तीशाली बनतो. व्हायरल व्हिडिओमध्ये दिसतं की जंगलात शिकारीच्या शोधात असेलला सिंह झेब्र्याजवळ पोहोचतो. झेब्र्याला काही कळायच्या आतच सिंह त्याच्यावर हल्ला करतो. मात्र आपला जीव वाचू शकतो, असं वाटू लागताच झेब्रा चवताळतो. रागात झेब्रा सिंहावरच पलटवार करतो. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की सिंह झेब्र्याची मान पकडतो आणि त्याला जमिनीवर पाडण्याचा प्रयत्न करतो. मात्र इतक्यात झेब्रा आपली संपूर्ण ताकद लावून आपली मान दुसऱ्या बाजूला फिरवतो. हे करून तो जंगलाच्या राजालाच जमिनीवर पाडण्याचा प्रयत्न करतो. मात्र सिंहदेखील हार मानायला तयार नसतो. तो पुन्हा एकदा पूर्ण ताकद लावून झेब्र्याची मान पकडतो. यानंतर दोघांच्यात भांडण सुरू होतं. पुढे पाहायला मिळतं की झेब्रा सिंहाला उचलून जमिनीवर आपटतो. यानंतर सिंह घाबरतो. मात्र तरीही तो झेब्र्याची मान सोडत नाही. यादरम्यान झेब्रा तिथून पळ काढण्यासाठी खूप प्रयत्न करतो. यामुळे झेब्र्यासोबत सिंहदेखील घसरत पुढे जातो. झेब्रा इतका रागात दिसतो, जणू त्याच्या हातात असतं तर त्याने सिंहाचा जीवही घेतला असता. बराच वेळ दोघांमध्ये संघर्ष सुरू असतो. अखेर जंगलाच्या राज्याला धक्का देत झेब्रा आपली सुटका करून घेतोच. हा व्हिडिओ @Animal_World नावाच्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर केला गेला आहे.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Video Viral On Social Media, Wild animal

    पुढील बातम्या