पाहून डोळे भिरभिरतील मात्र तरी कोणता झेब्रा समोर आहे ते ओळखा बरं...

पाहून डोळे भिरभिरतील मात्र तरी कोणता झेब्रा समोर आहे ते ओळखा बरं...

अनेक जण अजूनही योग्य उत्तर मिळवण्यासाठी आपले डोकं खाजवत आहे.

  • Share this:

मुंबई, 11 जुलै : सोशल मीडियावर (social media) चॅलेंज, पझल्स सोडवण्याकडे नेटिझन्सना कल नेहमीच असतो. आतापर्यंत आपणही अनेक फोटोतून एखादा प्राणी शोधला आहे. मात्र आता सोशल मीडियावर झेब्र्याचा (Zebra) फोटो व्हायरल (viral photo) होतो आहे. जो पाहता क्षणी भिरभिरी येते. मात्र हाच फोटो तुमच्यासाठी आता टास्क आहे.

फॉरेस्ट ऑफिसर प्रवीण कसवान यांनी हा फोटो आपल्या ट्विटरवर टाकला आहे. त्यानंतर तो सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. नेटिझन्स सुरुवातीला तर यामध्ये किती झेब्रा आहेत हे शोधत आहेत. त्यानंतर मग कोणता झेब्रा पुढे आहे, ते ओळखण्याचा प्रयत्न करत आहेत.

हा फोटो पाहिल्यानंतर सुरुवातीला काही जणांनी हा फोटो एडिट केल्याचं म्हटलं तर आणखी एका युझर्सने हा व्हिडीओ एडिट केलेला नाही तर प्रत्यक्ष टिपलेला फोटो असल्याचं सांगितलं. त्यानंतर सर्वांनी हा फोटा काढणाऱ्या फोटोग्राफरचंही कौतुक केलं.

आता तुम्हीदेखील जरा हा फोटो नीट पाहा आणि यामध्ये किती झेब्रा आणि कोणता झेब्रा समोर आहे ते सांगा.  अनेक जण अजूनही योग्य उत्तर मिळवण्यासाठी आपले डोकं खाजवत आहे. कारण कित्येकांना याचं उत्तर सापडलेलं नाही.

काही जण म्हणतात यामध्ये दोन झेब्रा आहेत, तरी काही जणांना वाटतं दोन नाही तर तीन झेब्रा आहेत. त्यानंतर प्रत्येक जण कोणता झेब्रा पुढे आहे, याबाबत तर्कवितर्क लढवत आहेत.

हे वाचा - दगड नव्हे तर हा आहे एक प्राणी; तुम्ही याला ओळखलंत का?

आता तुम्हीदेखील यात सहभागी व्हा. तुमच्याने हे कोडं सुटत नसेल तर मग तुमच्या कुटुंबातील सदस्य, नातेवाईक किंवा मित्रमैत्रिणींना ही बातमी पाठवा आणि त्यांना तुमची मदत करायला सांगा आणि तुम्हाला उत्तर मिळालं तर मग उत्तमच, तुम्ही इतरांना चॅलेंज द्या.

Published by: Priya Lad
First published: July 11, 2020, 7:42 AM IST

ताज्या बातम्या