• Home
 • »
 • News
 • »
 • viral
 • »
 • VIDEO - आईने पिल्लाला सिंहाच्या जबड्यातून खेचून काढलं; मातृशक्तीसमोर जंगलाच्या राजाचीही ताकद फेल

VIDEO - आईने पिल्लाला सिंहाच्या जबड्यातून खेचून काढलं; मातृशक्तीसमोर जंगलाच्या राजाचीही ताकद फेल

पिल्लासाठी झेब्र्याने सिंहाशी दिली झुंज.

 • Share this:
  मुंबई, 24 नोव्हेंबर : आईचं (Mother love) जिचं मन खूप कोमल असतं, एक स्त्री म्हणून तिच्यात कमी ताकद असते, असंच मानलं जातं. पण जेव्हा तिच्या मुलांवर संकट (Mother saved child) येतं तेव्हा हीच कोमल आणि कमजोर समजली जाणारी आई (Mother fight for child) काय करू शकते, याचा प्रत्यय वारंवार आला आहे. आपल्या मुलांसमोर आई ढाल बनून उभी राहते (Mother fight with animal for child). मुलांवर येणारं संकट ती स्वतःवर पेलते. मुलांसाठी ती कितीही मोठ्या संकटाचा सामना करू शकते. हे फक्त माणसांमध्येच नाही तर प्राण्यांमध्येही दिसून येतं (Zebra mother saved baby). सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर (Social media) व्हायरल (Viral video) होतो आहे. एका झेब्र्याने आपल्या पिल्लासाठी सिंहाशी झुंज दिली आहे (Zebra mother fight with lion). सिंहाच्या (Lion video) भीतीने स्वतःचा जीव वाचवण्याची दूर पळालेली आई (Zebra video) जेव्हा तिचा पिल्लू सिंहाच्या तावडीत सापडला (Lion attack on zebra) तेव्हा त्याच सिंहाला ती सामोरी गेली. आपल्या पिल्लाला तिने सिंहासारख्या भयंकर प्राण्याच्या जबड्यातून खेचून बाहेर काढलं (Zebra and lion video). सिंहाच्या तावडीतून त्याची सुटका केली (Zebra attack on lion). व्हिडीओत पाहू शकता एक झेब्रा पळताना दिसतो आहे. त्याच्या मागे त्याचं पिल्लूही पळतं आहे. या झेब्र्यांची शिकार करण्यासाठी त्यांच्यामागे सिंह आला होता. आपला जीव वाचवण्यासाठीच हे दोघंही पळत होते. हे वाचा -बिबट्याचं कधीच पाहिलं नसेल असं रूप; VIDEO पाहून तुमच्याही डोळ्यात येतील अश्रू आई झेब्रा इतक्या वेगाने पळाली की ती सिंहापासून खूप दूर गेली. पण बिच्चारं पिल्लू त्याला इतक्या वेगाने पळता आला नाही आणि ते सिंहाच्या तावडीत सापडलं. सिंहाने त्याची मान आपल्या जबड्यात धरून त्याला खेचलं. पिल्लू मोठमोठ्याने ओरडत होतं. पिल्लालाचा आवाज ऐकून सिंहापासून दूर गेलेली त्याची आई परत मागे आली. ज्या सिंहाला ती घाबरली होती त्याच सिंहाशी पिल्लासाठी तिने निर्भीडपणे लढा दिला. आपल्या पिल्लाला घेऊन ती तिथून पळाली. हे वाचा - अरेरे! जंगलाचा राजाही तिच्यासमोर भित्रा बोका; सिंहिणीने सिंहाचं काय केलं पाहा सिंह पाहतच बसला. सिंह इतका घाबरला की पुन्हा त्यांचा पाठलाग करण्याची हिंमतही त्याने केली नाही.  मातृशक्तीसमोर जंगलाच्या राजाचीही ताकद काहीच नाही हेच या व्हिडीओतून दिसून येतं. @DeepaShreeAB ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे.
  Published by:Priya Lad
  First published: