• Home
 • »
 • News
 • »
 • viral
 • »
 • कधीही पाहिलं नसेल झेब्र्याचं हे रूप; हरणाच्या पाडसावर केला भयंकर हल्ला, हृदय पिळवटणारा VIDEO

कधीही पाहिलं नसेल झेब्र्याचं हे रूप; हरणाच्या पाडसावर केला भयंकर हल्ला, हृदय पिळवटणारा VIDEO

व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये झेब्र्यांचा एक गट हरणाच्या पिल्लावर हल्ला करताना दिसतो. अमूमन झेब्र्याचं हे रूप तुम्ही आधी कधीही पाहिलं नसेल

 • Share this:
  नवी दिल्ली 31 ऑक्टोबर : जंगली प्राण्यांची लढाई पाहण्यासाठी सगळेच उत्सुक असतात (Fight Between Wild Animals). मात्र, अनेकदा या प्राण्यांची भांडणं आणि शिकारीची पद्धत पाहून आपण हैराणही होतो. विशेषतः तेव्हा जेव्हा तुम्ही एखाद्या प्राण्याचं भयंकर रूप कधीही पाहिलेलं नसतं. सध्या वाईल्ड लाईफचा असाच एक व्हिडिओ व्हायरल (Wildlife Viral Video) होत आहे. हा व्हिडिओ पाहून लोक हैराण झाले आहेत. व्हिडिओमध्ये झेब्र्यांचा कळप हार्टीबिस्टच्या ( हरणाची एक प्रजाती) पिल्लावर हल्ला करताना दिसतो (Zebra Attacked on Hartebeest). याला म्हणतात जिद्द! न थांबता इवल्याशा पक्षानं 239 तासात पार केलं 13000 KM अंतर वाईल्ड लाईफच्या जगात एकापेक्षा एक घटना पाहायला मिळतात. अनेक प्राणी आपलं मन जिंकून घेतात तर काही प्राणी बघताच आपल्याला घाम फुटतो. सध्या सोशल मीडियावर व्हायरल होणारा व्हिडिओ पाहून अनेकांचं हृदय पिळवटलं आहे. व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये झेब्र्यांचा एक गट हरणाच्या पिल्लावर हल्ला करताना दिसतो. अमूमन झेब्र्याचं हे रूप तुम्ही आधी कधीही पाहिलं नसेल. याच कारणामुळे हा व्हिडिओ पाहून लोक हैराण झाले आहेत.
  View this post on Instagram

  A post shared by طبیعت (@nature27_12)

  व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, की हार्टीबिस्ट आपल्या पिल्लाला या झेब्र्यांपासून वाचवण्याचा पूर्ण प्रयत्न करतं. मात्र, एक झेब्रा या पिल्लाच्या मागेच लागतो. झेब्र्याचं हे रूप खरंच आश्चर्यचकीत करणारं आहे. तुम्ही पाहू शकता की झेब्रा हार्टीबिस्टच्या नाजूक पिल्लावर डेड किकचा वापर करतं. कुत्र्याने लहान पिल्लाप्रमाणे पुरवले मांजरीचे लाड; हा VIDEO जिंकेल तुमचं मन हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर nature27_12 नावाच्या अकाऊंटवरुन शेअर केला गेला आहे. एक दिवस आधी शेअर झालेला हा व्हिडिओ 35 हजारहून अधिकांनी पाहिला आहे. झेब्र्याचं हे रूप पाहून सगळेच हैराण झाले आहेत. अनेकांनी सवाल केला आहे, की झेब्रा हरणाच्या पिल्लाच्या मागे का लागला आहे. एका यूजरनं कमेंट करत लिहिलं, की झेब्रा पिल्लावर हल्ला का करत आहे? आणखी एका यूजरनं लिहिलं, हे पाहिल्यामुळे झेब्रा आजपासून माझ्यासाठी मरून गेला आहे. आणखी एका यूजरनं म्हटलं, मी कधीही असा विचार केला नव्हता की झेब्रा असं करू शकतो.
  Published by:Kiran Pharate
  First published: