मुंबई, 21 फेब्रुवारी : भारत विरुद्ध इंग्लंड (IND vs ENG) यांच्यातील तिसरी टेस्ट अहमदाबादच्या मोटेरा स्टेडियममध्ये 24 फेब्रुवारी पासून खेळली जाणार आहे. जगातील सर्वात मोठ्या स्टेडियमवर होणारी ही टेस्ट खेळण्यासाठी दोन्ही टीम सध्या जोरदार तयारी करत आहेत. या मॅचमध्ये टीम इंडिया पूर्ण तयारीनं उतरणार आहे. कारण, या टेस्टचचा निकाल वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप स्पर्धेची (ICC World Test Championship) फायनल गाठण्यासाठी निर्णयाक ठरू शकतो याची टीमला कल्पना आहे. ही मॅच सुरू होण्याच्या तीन दिवस अगोदर भारताचा क्रिकेटपटू युजवेंद्र चहलची (Yuzvendra Chahal) पत्नी धनश्री वर्मा (Dhanashree Verma) हीनं एक मजेदार डान्स व्हिडीओ शेअर केला आहे.
धनश्रीनं हा व्हिडीओ तिच्या इन्स्टाग्राम (Instagram) अकाऊंटवरुन शेअर केला असून या व्हिडीओमध्ये तिनं एका गुजराती गाण्यावर नाच केला आहे. हाच नाच करताना ती संपूर्णपणे क्रिकेटच्या रंगात रंगली आहे. तिनं यामध्ये बॉलिंग आणि बॅटिंगचे हावभावही केले आहेत. तसंच ‘अहमदाबाद तयार राहा’ असं ती यामधून सांगत आहे. तिचा हा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत असून तिच्या फॅन्समध्ये लोकप्रिय झाला आहे.
View this post on Instagram
धनश्री वर्मा एक यूट्यूबर असून डान्सर व कोरिओग्राफर आहे. तिची स्वत:ची कंपनीही आहे. तिचं यूट्यूब चॅनलही प्रचंड लोकप्रिय आहे. युजवेंद्र चहलसोबत तिचा साखरपुडा मागच्या वर्षी ऑगस्ट महिन्यात झाला होता. त्यानंतर युएईमध्ये झालेल्या इंडियन प्रीमियर लीग (IPL) स्पर्धेतही ती चहलसोबत दिसली. चहल ऑस्ट्रेलिया दौऱ्याहून परतल्यानंतर त्या दोघांनी डिसेंबर महिन्यात लग्न केलं.
( स्पायडरमॅन, स्पायडरमॅन... ऋषभ पंतचा नवा VIDEO तुम्ही पाहिला का? )
भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात अहमदाबादमध्ये होणाऱ्या पाच टी-20 मॅचच्या मालिकेसाठी भारतीय टीमची घोषणा करण्यात आली आहे. या टीममध्ये युजवेंद्र चहलचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे टी-20 मालिकेच्या दरम्यान धनश्री आपल्याला अहमदाबादच्या स्टेडियमध्ये मॅच पाहताना दिसू शकेल.