10 हजार लीटर Coca-Cola मध्ये टाकला बेकिंग सोडा, 4 वर्षांनी काय झालं पाहा; VIDEO VIRAL

10 हजार लीटर Coca-Cola मध्ये टाकला बेकिंग सोडा, 4 वर्षांनी काय झालं पाहा; VIDEO VIRAL

भयंकर! 10 लीटर Coca-Cola बेकिंग पावडर टाकल्यानंतर जे काही झालं, ते पाहून विश्वास बसणार नाही. पाहा हा VIDEO

  • Share this:

मॉस्को, 26 ऑगस्ट : सोशल मीडियावर कोका-कोलासह विविध वैज्ञानिक प्रयोग केले जातात. यात बेकिंग सोडा आणि मेंटॉस टाकून एक छोटा स्फोट घडवून आणणारा प्रयोग कित्येकांनी केला आहे. मात्र रशियामध्ये एका व्यक्तीनं केलेल्या या स्टंटमुळे अख्खं शहर हादरलं. न्यूयॉर्क पोस्टनं दिलेल्या वृत्तानुसार YouTuber मॅक्सिम मोनाखॉव्हने चार वर्षांपूर्वी कोका-कोलापासून एक ज्वालामुखी तयार केला होता. त्यानं एका व्हिडीओमध्ये तब्बल 10 हजार लीटर कोका-कोलामध्ये बेकिंग सोडा टाकल्याचे दाखवले होते. सोशल मीडियावर हा व्हिडीओ जोरदार व्हायरल झाला आहे.

एका टीमच्या मदतीने मोनाखॉव्ह ज्याला मॅमिक्स या नावाने ओळखले जाते. त्यानं एका रिकाम्या मैदानाच्या मध्यभागी एक प्रचंड मोठा गिझर बसवला होता. डेली मेलनं दिलेल्या वृत्तानुसार मॅमिक्सनं या व्हि़डीओसाठी 7 लाखाहून अधिक रूबल खर्च केले असल्याचे सांगितले. 20-मिनिटांच्या व्हिडीओमध्ये, त्याने आणि त्याच्या टीमने गिझरमध्ये हजारो लिटर सोडा भरला आणि नंतर त्यात बेकिंग सोडा टाकून एक प्रचंड स्फोट घडवून आणला.

वाचा-VIDEO: वाद घातला म्हणून महिलेनं आधी वॉचमनच्या कानशिलात लगावली मग चप्पलेनं मारलं

वाचा-...आणि बघता बघता 1 किमी लांब वाहून गेला तरूण! पाहा थरारक LIVE VIDEO

हा व्हि़डीओ मॅमिक्सने 21 ऑगस्ट रोजी शेअर केला. हा व्हिडीओला आतापर्यंत 70 लाखांहून अधिक लोकांनी पाहिले आहे.

वाचा-...आणि बघता बघता 1 किमी लांब वाहून गेला तरूण! पाहा थरारक LIVE VIDEO

एका युझरने यावर असे लिहिले की, 'हा प्रयोग पाहून मजा आली. मी अजूनही हसू थांबवू शकत नाही आहे.' तर, दुसर्‍या युझरने लिहिले की, 'मी दोन लिटर कोका कोलाच्या बाटलीमध्ये मेंटोस टाकून स्फोट केला होता.

Published by: Priyanka Gawde
First published: August 26, 2020, 8:15 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading