Home /News /viral /

एकाच तरुणीला दोन गर्भाशय, योनीसुद्धा दोन! YouTuber महिलेने स्वतःच केलाय खुलासा

एकाच तरुणीला दोन गर्भाशय, योनीसुद्धा दोन! YouTuber महिलेने स्वतःच केलाय खुलासा

कसान्ड्रा बैकसन

कसान्ड्रा बैकसन

प्रत्येक महिलेच्या शरीरात हा प्रायव्हेट पार्ट म्हणजेच योनी (Vagina) फक्त एकच असते. युट्यूबवरील प्रसिद्ध ब्लॉगर कसान्ड्रा बॅकसन स्वत:बद्दल धक्कादायक माहिती दिली आहे.

    नवी दिल्ली, 3 जानेवारी: जवळपास सगळ्याच माणसांची शरीररचना एकसारखी असली तरी प्रत्येकाचं शरीर मात्र वेगळं असतं. काहींना एखादा अवयव कमी असतो तर काहींना मात्र एखादा अवयव जास्तही असतो. काहींना जन्मत: एखादं व्यंग असू शकतं. अशा केसेस दुर्मिळ असल्या तरी त्या दुर्मिळपणामुळेच त्यांची चर्चा होते. हातापायाला एखादं बोट जास्त असणं किंवा एकाच धडाला दोन डोकी चिकटलेली असणं अशाही काही व्यक्ती असतात. त्यांबाबतच्या बातम्या आतापर्यंत तुम्ही ऐकल्या असतील. पण एका महिलेच्या शरीरात चक्क दोन योनी आहेत. याचबद्दलचं वृत्त झी न्यूजनं दिलं आहे. प्रत्येक महिलेच्या शरीरात हा प्रायव्हेट पार्ट म्हणजेच योनी (Vagina) फक्त एक आणि एक गर्भाशय (Uterus) असते. युट्यूबवरील प्रसिद्ध ब्लॉगर कसान्डा बॅकसननं स्वत:बद्दल धक्कादायक माहिती दिली आहे. तिच्या शरीरात दोन योनी (Vagina) तर आहेतच पण गर्भाशयंही (Uterus) दोन आहेत. असे तिने सांगितले आहे. त्यामुळे ही दुर्मिळातील दुर्मिळ केस असल्याचं बोललं जात आहे. ही गोष्ट सांगण्यासाठी गेली कित्येक वर्ष मी बळ एकवटत होते असं कसांडानं म्हटलं आहे. खूप वर्ष विचार केल्यानंतर मी ही गोष्ट जगासमोर सांगण्याचं ठररवलं असं तिनं सांगितलं. आपण इतर सर्वसामान्य मुलींसारख्या नाही हे सांगण्यासाठी तिनं एका चार्टची मदत घेतली. तिनं हे जाहीर केल्यानंतर अर्थातच तिच्या ब्लॉगवर प्रतिक्रिया आणि प्रश्नांचा प्रचंड पाऊस पडला आहे. आतापर्यंत जगभरातील केवळ दोन महिलांनीच हे सत्य जगासमोर मांडण्याची हिंमत केली आहे. कसांडा त्यातील एक आहे. कसांडानं आपल्याला दोन योनी असल्याचं जाहीर केल्यानंतर तिला सगळ्यांत जास्त प्रश्न तिच्या सेक्स लाईफबद्दल विचारण्यात आले. तर अनेक महिलांना तिच्या मासिक पाळीबद्दल जाणून घेण्याचीही उत्सुकता होती. 'त्या' जेवणामुळे सुरू होताच कपलच्या Love Story चा END; कारण जाणून व्हाल थक्क आपली मासिक पाळी सामान्य महिलांप्रमाणेच असल्याचं तिनं सांगितलं. तिच्या दोन फॅलोपियन ट्युब एकमेकांना जोडलेल्या आहेत. त्यामुळे तिला महिन्यातून एकदाच मासिक पाळी येते असं तिनं स्पष्ट केलं. मात्र तिच्या सेक्स लाईफबद्दल जाणून घेण्यासाठी अनेकजण उतावीळ दिसले. यापूर्वी 27 वर्षांच्या हेजल जॉन्स हिलाही दोन योनी असल्याचं समोर आलं होतं. अगदी तरुण वयात यामुळे आपल्याला प्रचंड पोटदुखीचा त्रास सहन करावा लागला असं हेजलनं सांगितलं होतं. अर्थातच कसांडानं आपल्या दोन योनींबद्दल जाहीर केल्यानंतर सगळ्यांनाच धक्का बसला आहे. शास्त्रज्ञांच्या मते ही अत्यंत दुर्मिळ केस आहे. अशा अनेक आश्चर्यकारक गोष्टी जगात अस्तित्वात असतात. आपल्या शरीराबद्दल अशी माहिती उघड करायलाही धैर्य लागतं. ते कसांडानं दाखवलं याबद्दल तिचं कौतुक करायला हवं.
    First published:

    Tags: Viral news

    पुढील बातम्या