Home /News /viral /

बापरे! बुल्डोझरला लटकून गरागरा फिरताना फुटली कवटी, कॅमेऱ्यात कैद झाली भयंकर दुर्घटना; VIDEO VIRAL

बापरे! बुल्डोझरला लटकून गरागरा फिरताना फुटली कवटी, कॅमेऱ्यात कैद झाली भयंकर दुर्घटना; VIDEO VIRAL

बुल्डोझरवर खतरनाक स्टंट करताना तरुणासोबत घडली भयंकर दुर्घटना.

    वॉशिंग्टन, 01 जुलै : सोशल मीडियावर प्रसिद्ध होण्यासाठी लोक काय काय नाही करत. अगदी आपला जीव धोक्यात टाकत जीवघेणे, खतरनाक स्टंटही करतात. असाच एक शॉकिंग व्हिडीओ समोर आला आहे (Shocking stunt video viral). ज्यात एका युट्यूबरने आपल्या साथीदाराला बुल्डोझरला बांधून समुद्रात गरागरा फिरवलं. त्यानंतर त्या तरुणाची कवटीच फुटली आहे. हे भयानक दृश्य कॅमेऱ्यात कैद झालं आहे. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे (Skull shattered while doing stunt on bulldozer). डेव्हिड डोब्रिक आणि जेफ विटेक हे दोघं युट्यूबर आहेत. दोघांनीही पाण्यात एक भयानक स्टंट केला. बुल्डोझरसोबत त्यांनी नको ते खेळ केला. डेव्हिड बुल्डोरझरच्या आत बसून बुल्डोझर चालवत होता. तर जेफ बुल्डोझरला लटकला होता. त्यानंतर डेव्हिडने जेफला गरागरा फिरवलं. त्याच वेळी भयंकर दुर्घटना घडली. जेफने आपल्या युट्यूब चॅनेलवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओत पाहू शकता गरागरा फिरता फिरता जेफ अचानक बुल्डोझरला आपटला. त्यानंतर सर्वजण घाबरले आणि त्याच्या दिशेने धावत गेले. हे वाचा - बापरे! दोरीवरून 2 डोंगर पार करण्याचा तरुणाने केला प्रयत्न शेवटी...; काळीज घट्ट करून पाहा हा VIDEO जेफने या दुर्घटनेला डेव्हिड जबाबदार असल्याचा आरोप केला आहे. आज तकने TMZ रिपोर्टचा हवाला देत दिलेल्या वृत्तानुसार, जेफने सांगितलं की डेव्हिडच्या सोशल मीडिया कमबॅकसाठी व्हिडीओ शूट केला जात होता. त्यासाठी ते अमेरिकेतील ऊटा तलावात गेले. डेव्हिडने आपल्या मित्रांना सांगितलं की ते बुल्डोझरच्या बकेटला लटकत असलेल्या दोरीला पकडतील आणि तो त्यांना बुल्डोझरच्या चारही बाजूला फिरवेल. जेव्हा जेफची वेळ आली तेव्हा डेव्हिडने वेग वाढवला, वेग जास्त वाढल्याचं त्याच्या लक्षात आलं तेव्हा त्याने अचानक स्पीड कमी केला त्यामुळेच ही दुर्घटना घडली आणि तो गंभीररित्या जखमी झाला. ही घटना 2020 सालातील आहे. पण आता दोन वर्षांनंतर जेफने डेव्हिडविरोधात कोर्टात याचिका करत भरपाई मागितली आहे. हे वाचा - याला चमत्कार म्हणावं की नशीब! व्यक्ती चालत असतानाच अचानक कोसळला पूल पण...; Video चा शेवट पाहून हैराण व्हाल जेफने दिलेल्या माहितीनुसार त्याच्या पायाला दुखापत झाली. पायातील एक लिगामेंट फाटलं आणि त्याची कवटीही फुटली. एक डोळा तर जवळपास त्याने गमावलाच होता. या घटनेमुळे आपलं खूप नुकसान झालं आहे. आर्थिक हानी झाली आहे. कमाई कमी झाली आणि उपचारात खूप खर्च झाला आहे. त्याने डेव्हिडकडून आपल्याला 80 कोटींची भरपाई मिळावी यासाठी कोर्टात याचिका केली आहे.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Accident, Viral, Viral videos

    पुढील बातम्या