मराठी बातम्या /बातम्या /Viral /मित्र ठरला देवदूत; भीषण अपघातातून असा वाचवला तरुणाचा जीव, थरकाप उडवणारा VIDEO

मित्र ठरला देवदूत; भीषण अपघातातून असा वाचवला तरुणाचा जीव, थरकाप उडवणारा VIDEO

दोन लोक रस्त्याच्या कडेने जात असताना अचानक ट्रॉली पडते, सुदैवाने त्या मुलाच्या मित्राने त्याला लगेच खेचलं. अन्यथा यात त्याचा जागीच मृत्यू झाला असता, यात शंका नाही.

दोन लोक रस्त्याच्या कडेने जात असताना अचानक ट्रॉली पडते, सुदैवाने त्या मुलाच्या मित्राने त्याला लगेच खेचलं. अन्यथा यात त्याचा जागीच मृत्यू झाला असता, यात शंका नाही.

दोन लोक रस्त्याच्या कडेने जात असताना अचानक ट्रॉली पडते, सुदैवाने त्या मुलाच्या मित्राने त्याला लगेच खेचलं. अन्यथा यात त्याचा जागीच मृत्यू झाला असता, यात शंका नाही.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

नवी दिल्ली 02 एप्रिल : सोशल मीडियावर दररोज अपघातांशी संबंधित व्हिडिओ शेअर केले जातात. ज्यातील काही व्हिडिओ पाहिल्यानंतर सर्वांनाच धक्का बसतो. हे अपघात टाळण्यासाठी एकच उपाय आहे, तुम्ही सदैव सावध राहा. कारण इथे अनेकदा चूक तुमची नसते, पण तरीही तुम्हाला शिक्षा भोगावी लागते. असाच एक व्हिडिओ सध्या चर्चेत आहे. ज्यामध्ये एक व्यक्ती रस्त्यावरून चालत आहे पण त्याच दरम्यान मागून एक गाडी त्याला जोरात धडक देणार असते. मात्र सुदैवाने त्याचा जीव वाचतो.

रस्त्यावर उतरला बिबट्या; मग समोर उभा असलेल्या व्यक्तीजवळ जात जे केलं ते चकित करणारं..VIDEO

रस्ते अपघातामुळे दररोज अनेक कुटुंब उद्ध्वस्त होतात आणि त्यांची संख्या इतकी आहे की ते थांबवणंही शक्य नाही. म्हणूनच रस्त्यावरून चालताना प्रत्येकाने अत्यंत सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. कारण जर तुमचं लक्ष इकडे तिकडे भटकलं तर तुमचा अपघात कधीही आणि कसाही होऊ शकतो. जरा ही क्लिप बघा, ज्यात दोन लोक रस्त्याच्या कडेने जात असताना अचानक ट्रॉली पडते, सुदैवाने त्या मुलाच्या मित्राने त्याला लगेच खेचलं. अन्यथा यात त्याचा जागीच मृत्यू झाला असता, यात शंका नाही.

या चकित करणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की रस्त्यावर अनेक वाहने धावत आहेत आणि दोन मित्र बाजूने बोलत चालले आहेत. दरम्यान, अचानक एक ट्रॅक्टर येतो आणि त्याची ट्रॉली रस्त्यावरच पलटते. हे सर्व इतक्या वेगाने घडलं की कोणालाही काही समजण्याची संधी मिळत नाही. परंतु मुलाचा मित्र इतका सतर्क होता, की त्याने लगेचच आपल्या मित्राला मृत्यूच्या तोंडातून बाहेर काढलं. इथे क्षणभरही विलंब झाला असता तर मुलाचा मृत्यू निश्चित होता.

हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे. हे वृत्त लिहेपर्यंत 79 हजारांहून अधिक लोकांनी ही क्लिप पाहिली असून त्यावर कमेंट करत आपली प्रतिक्रिया देत आहेत. एका यूजरने लिहिलं, 'या मुलाचं नशीब खरंच खूप चांगलं होतं.' तर दुसऱ्या यूजरने लिहिलं की, 'हा मित्र देवदूतापेक्षा कमी नाही.' आणखी एका यूजरने लिहिलं की, 'म्हणूनच रस्त्याने चालताना खूप काळजी घेण्याचा सल्ला दिला जातो'.

First published:
top videos

    Tags: Accident, Shocking video viral