कराड रेल्वे स्थानकावर हायहोल्टेज वायरीवर लोंबकळत होता मनोरुग्ण, LIVE VIDEO

कराड रेल्वे स्थानकावर हायहोल्टेज वायरीवर लोंबकळत होता मनोरुग्ण, LIVE VIDEO

या मनोरुग्ण तरुणाच्या पराक्रमाने काहींची करमणूक तर काहींची तारांबळ झाली. रेल्वे कर्मचाऱ्यांनी आधी या मनोरुग्णाची समजूत काढली पण तो...

  • Share this:

कराड, 03 एप्रिल : सातारा (Satara) जिल्ह्यातील कराड रेल्वे स्थानकावर ( Karad railway station) आज अंगावर शहारे आणणार प्रकार घडला. एक मनोरुग्ण तरुण रेल्वेच्या मुख्य विजेच्या वायरांवर चढला होता. त्यामुळे एकच खळबळ उडाली होती. अखेर रेल्वेच्या कर्मचाऱ्यांनी मोठ्या हिंमतीने या तरुणाला खाली उतरवले.

कराड रेल्वे स्थानकावर आज दुपारी ही घटना घडली. एक मनोरुग्ण तरुण अचानकपणे खांबावर चढून मुख्य विजेच्या हायहोल्टेज वायरावर जाऊन लोंबकाळत होता. हे पाहून उपस्थितीत प्रवाशी आणि कर्मचाऱ्यांची एकच भंबेरी उडाली.

हा तरुण तिथे पोहोचलाच कसा असा प्रश्न सर्वांना पडला. सुदैवाने हायहोल्टेज वायरांमध्ये वीज प्रवाह बंद होता. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. पण, रेल्वे वाहतूक सुरू असल्यामुळे या मनोरुग्णामुळे आणखी गोंधळ उडाला.

DMart च्या दमानी बंधुंनी मलबार हिलजवळ विकत घेतला बंगला; किंमत वाचून धक्काच बसेल!

या मनोरुग्ण तरुणाच्या पराक्रमाने काहींची करमणूक तर काहींची तारांबळ झाली. रेल्वे कर्मचाऱ्यांनी आधी या मनोरुग्णाची समजूत काढली पण तो खाली उतरण्यास काही तयार नव्हता. खूप प्रयत्न केल्यानंतर त्या व्यक्तीस खाली उतरविण्यात आले. त्यानंतर त्याला बेदम चोप देऊन पोलिसांच्या हवाली करण्यात आले.

सदर व्यक्ती हा झारखंडचा असून तो मुळात मनोरुग्ण असल्याचे समजते. हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

Published by: sachin Salve
First published: April 3, 2021, 11:30 PM IST
Tags:

ताज्या बातम्या