Home /News /viral /

OMG: बघता-बघता क्षणार्धात त्याचा स्टंट फसला, उंचावरून भंयकर पद्धतीनं कोसळला तरूण

OMG: बघता-बघता क्षणार्धात त्याचा स्टंट फसला, उंचावरून भंयकर पद्धतीनं कोसळला तरूण

व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेकांच्या अंगावर काटा यावा असा थरार पाहायला मिळत आहे. व्हिडिओमध्ये जबरदस्त स्टंट करणारा एक माणूस उंचावरून पडताना दिसत आहे.

  नवी दिल्ली, 21 मे : तरुणांमध्ये स्टंट व्हिडिओ आणि अ‌ॅडव्हेंचर गेम्सची क्रेझ सध्या खूप वाढली आहे. आजकाल अनेक तरुणांना आपले धोकादायक स्टंट आणि हटके अ‌ॅक्शन दाखवून सर्वांना प्रभावित करण्याचा मोह आहे. युजर्स बघतच राहतील असे साहसी स्टंट करण्याचा अनेकांचा प्रयत्न असतो. असे व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरलही होतात. व्हिडिओ खूप आवडला आहे. असे स्टंट करताना उत्तमोत्तम कुशल लोकांचाही घाम फुटतो. पण, तसं पाहायला गेलं तर स्टंट करणं ही काय सोपी गोष्ट नाही. आजकाल अनेक प्रकारचे स्टंटमन त्यांच्या अप्रतिम युक्त्या वापरून स्टंट करताना दिसतात. ज्यामध्ये खूप धोका पत्करूनही ते सहज करत असतात. असे धोकादायक स्टंट करण्यासाठी शरीर चपळ असणे सर्वात महत्त्वाचे आहे. अनेकांना आवडेल असा स्टंट करण्यासाठी काहीजण धोका पत्करतात. मात्र, असं करणं कधी अंगलट येईल आणि जीवघेणं ठरेल हे सांगता येत नाही.
  नुकताच एका व्यक्तीचा धोकादायक स्टंट करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यामध्ये व्यक्ती स्टंट करताना खाली पडताना दिसत आहे. त्यामुळे त्याचा स्टंट अयशस्वी होतो. व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेकांच्या अंगावर काटा यावा असा थरार पाहायला मिळत आहे. व्हिडिओमध्ये जबरदस्त स्टंट करणारा एक माणूस उंचावरून पडताना दिसत आहे. हे वाचा - Childhood Obesity: तुमचं मूलही दिवसेंदिवस लठ्ठ होत चालंलय? आरोग्य तज्ज्ञांकडून जाणून घ्या उपाय व्हिडिओमध्ये एक व्यक्ती आपला स्टंट दाखवत उंच जागेवरून खाली उतरताना दिसत आहे. त्यादरम्यान खाली येताना त्याचा पाय घसरला आणि तो भरधाव वेगाने जमिनीवर पडला. त्यामुळे त्याला खूप दुखापत होते. सध्या कोणतीही गंभीर दुखापत न झाल्याने ती व्यक्ती वेगाने उठून तेथून चालत जाते. वृत्त लिहेपर्यंत या व्हिडिओला सोशल मीडियावर लाखो व्ह्यूज मिळाले आहेत.
  Published by:News18 Desk
  First published:

  Tags: Shocking viral video, Viral

  पुढील बातम्या