मराठी बातम्या /बातम्या /Viral /

मृत मुलांना ख्रिसमसच्या भेटवस्तू देतो हा तरुण; अनेक वर्षांपासून करतोय अनोखं काम

मृत मुलांना ख्रिसमसच्या भेटवस्तू देतो हा तरुण; अनेक वर्षांपासून करतोय अनोखं काम

ख्रिसमसच्या (christmas) दिवशी सांताक्लॉज (Santa Clause) आपल्याला काय भेटवस्तू देणार याची सर्वाधिक उत्सुकता लहान मुलांना लागलेली असते.

ख्रिसमसच्या (christmas) दिवशी सांताक्लॉज (Santa Clause) आपल्याला काय भेटवस्तू देणार याची सर्वाधिक उत्सुकता लहान मुलांना लागलेली असते.

ख्रिसमसच्या (christmas) दिवशी सांताक्लॉज (Santa Clause) आपल्याला काय भेटवस्तू देणार याची सर्वाधिक उत्सुकता लहान मुलांना लागलेली असते.

    नवी दिल्ली, 26 डिसेंबर: ख्रिसमसच्या (christmas) दिवशी सांताक्लॉज (Santa Clause) आपल्याला काय भेटवस्तू देणार याची सर्वाधिक उत्सुकता लहान मुलांना लागलेली असते. आपल्या आवडीची वस्तू आपल्याला मिळावी यासाठी ते स्वत:ची विशलिस्ट बनवतात. त्यांना या भेटवस्तू देखील मिळतात. जिवंत मुलांना तर सर्वजण गिफ्ट देतात. पण जगात असाही एक व्यक्ती आहे, जो मृत पावलेल्या लहान मुलांसाठी ख्रिसमसच्या दिवशी भेटवस्तू खरेदी (Best Gifts for Kids) करतो. गेल्या अनेक वर्षांपासून हा तरुण मृत मुलांसाठी भेटवस्तू खरेदी करत आहे. खरंतर, ख्रिसमस सणाच्या दिवशी घरातील सर्व सदस्यांना भेटवस्तू दिल्या जातात. विशेषत: प्रत्येकजण घरातील लहान मुलांना त्यांच्या आवडीच्या भेटवस्तू देऊन त्यांच्या चेहऱ्यावर एक सुंदर हास्य आणण्याचा प्रयत्न करतो. पण ओवेन ऑस्बोर्न-विलियम्स (Owen Osborne-Williams) नावाचा एक तरुण मात्र गेल्या सात वर्षांपासून लहान वयातच जगातून निरोप घेतलेल्या मुलांना ख्रिसमस भेटवस्तू देतो. हा तरुण गिफ्ट पेपरमध्ये पॅक केल्यानंतर, ही भेटवस्तू संबंधित मुलांच्या कबरीवर ठेवतो. हेही वाचा-कुत्र्याच्या बर्थ डेसाठी महिलेनं उडवले लाखो रुपये, ड्रोन शो पाहून लोक हैराण मिररने दिलेल्या वृत्तानुसार, 17 वर्षीय ओवेन ऑस्बॉर्न 10 वर्षांचा असल्यापासून हे काम करत आहे. जी मुलं एक वर्षाची व्हायच्या आत मरण पावली आहेत. अशा मुलांना ख्रिसमसच्या दिवशी भेटवस्तू देण्याचं काम हा तरुण करतो. ख्रिसमसच्या दिवशी हा तरुण विविध प्रकारची खेळणी आणि भेटवस्तू त्यांच्या कबरीवर ठेवतो. इतकंच नव्हे तर यासाठी त्याने आपल्या पालकांच्या मदतीने अन्य लोकांकडून देणगी देखील गोळा केली होती. या पैशातून त्याने अनेक टेडी बेअर खरेदी करून चिमुकल्या मृत मुलांच्या कबरीवर ठेवल्या होत्या. हेही वाचा-घनदाट काळोखात लोकवस्तीत शिरला बिबट्या; तिघांना केलं रक्तबंबाळ,धडकी भरवणारा VIDEO असं का करतो तरुण? खरं तर, ओवेन दहा वर्षांचा असताना त्याच्या मावशीचं निधन झालं होतं. ख्रिसमसच्या एक दिवस आधी त्यांनी जगाचा  निरोप घेतला होता. मावशीच्या निधनाने ओवेनला खूप दुःख झालं होतं. मावशीच्या अंत्यविधीसाठी स्मशानभूमीत गेला असता, संबंधित स्मशानभूमीत नवजात लहान मुलांच्या कबरीसाठी एक वेगळा विभाग तयार करण्यात आला होता. येथे वर्षभराच्या आत मृत पावलेल्या लहान मुलांवर अंत्यसंस्कार केले जात होते. संबंधित मुलांच्या कबरी पाहून 10 वर्षाच्या ओवेनला अतिशय वाईट वाटलं. एक वर्षाच्या आतच त्यांचं निधन झाल्याने त्यांना आयुष्यात कधीच ख्रिसमसच्या भेटवस्तू मिळू शकल्या नाहीत. यामुळेच ओवेन हा दरवर्षी या लहानग्या मुलांसाठी कबरीवर भेटवस्तू ठेवतो.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Christmas

    पुढील बातम्या