नवी दिल्ली 05 जून : कामावर असताना सुट्टी मिळवण्यासाठी अनेक लोक वेगवेगळे बहाणे करत असतात. कधी कधी तर हे बहाणे इतके विनोदी असतात की ते इतरांचंही मनोरंजन करून जातात. असाच आणखी एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल (Funny Video Viral on Social Media) होत आहे. एका व्यक्तीनं कामावरुन सुट्टी मिळवण्यासाठी घातलेल्या घाटाचा मजेशीर किस्सा शेअर केला आहे. त्यानं असा सवाल केला आहे, की कामावरुन सुट्टी मिळवण्यासाठी तुम्ही कधी चक्कर (faint) आल्याचं नाटक केलंय का? हा सवाल करत त्यानं केलेल्या या नाटकाचा किस्सा सांगितला आहे.
ट्विटर युझर इलपेरडो द 2nd यानं एक व्हिडिओ पोस्ट करत लिहिलं आहे, की सुट्टी मिळवण्यासाठी तुम्ही केलेली सर्वात भन्नाट युक्ती कोणती होती. ही मी केलेली युक्ती आहे. त्यादिवशी बॉक्सिंग होती आणि मला तिथे जायचे होते. त्यामुळे, मी हा सगळा घाट घातला. हे सर्व करताना मॅनेजरही आसपासच आहे का, याचीही खात्री करून घ्या.
या व्हिडिओमध्ये दिसत आहे, की हा युवक एका सुपरमार्केटमध्ये कामाला आहे आणि काउंटरवर तो एका मुलीसोबत बोलत आहे. काही वेळानंतर तो अचानक हाताने आपलं डोकं धरतो. नंतर शेजारीच असलेल्या प्लास्टिक डिव्हाइडरला हात लावून उभा राहातो. काही वेळात तो डाव्या बाजूला झुकतो आणि जमिनीवर कोसळतो.
What’s the best way you’ve ever blagged getting off work sick this is mine it was Boxing Day I was hungover and 18 and wanted to go out later so decided to pull this off 😭 made sure the manager was there as well pic.twitter.com/wIBuu2KWGL
— elpedro ⭐️⭐️ (@ElpedroThe2nd) June 3, 2021
कमेंट सेक्शनमध्ये या व्यक्तीनं पुढे सांगितलं, की सर्वांना वाटलं की याला खरंच चक्कर आली आहे आणि यानंतर मला घरी तर पाठवलंच मात्र फ्रीमध्ये एक गॅलेक्सी बार आणि Lucozade ही मिळालं. त्यानं पुढे सांगितलं, की फरशीवर पडल्यानंतर आपल्याला दुखापत होऊ शकते याची कल्पना मला होती. त्यामुळे, मी माझं डोकं तिथे अशा प्रकारे आदळून घेतलं, की समोरच्या त्या खरंही वाटावं आणि मलाही दुखापत होऊ नये.
माहूतच्या मृत्यूनंतर हत्तीलाही कोसळलं रडू; अंत्यदर्शनाचा भावनिक VIDEO आला समोर
एका युजरनं कमेंट करत विचारलं, की त्यांना हे सत्य कधी समजलं तर? यावर उत्तर देत त्यानं म्हटलं, की मी हे सगळं नाटक व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या महिलेला दीड वर्षानंतर सांगितलं होतं. मात्र, तिनंही ते अगदी सहजपणे घेतलं. आम्ही सगळे आता तिथून बाहेर पडलो आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Funny video, Videos viral