• Home
 • »
 • News
 • »
 • viral
 • »
 • मित्राला वाचविण्यासाठी तरुणाने उधाणलेल्या पाण्यात मारली उडी; Video पाहून हृदयाचा ठोका चुकेल

मित्राला वाचविण्यासाठी तरुणाने उधाणलेल्या पाण्यात मारली उडी; Video पाहून हृदयाचा ठोका चुकेल

निसर्गा पुढे ही मैत्री वरचढ ठरली आहे, अशी प्रतिक्रिया सध्या सोशल मीडियावरुन येत आहे.

 • Share this:
  जागतिक मैत्री दिनानिमित्ताने (Friendship Day) तुम्हाला खूप शुभेच्छा मिळाल्या असतील. अगदी एकमेकांच्या घरी जाऊन सेलिब्रेशनही केलं असेल. मात्र नेहमीच म्हणतात तसं मैत्री ही काही एक दिवस साजरी करता येत नाही. तसं पाहता कुठलच नातं कधी एकच दिवशी शेअर करुन पूर्ण होत नाही. तर वेळोवेळी अनेक संघर्षातून ते अधिक घट्ट होत राहतं. मैत्री सुद्धात वर्षानुवर्षे अधिक परिपक्व होत जाते. इतकी की स्वत:चा विचार करण्यापूर्वी आपण आपल्या मित्र वा मैत्रिणीचा विचार करतो. (young man jumped into the stream of water to save his friend shocking video ) असाच एक अत्यंत हृदयस्पर्शी व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये एका तरुणाने आपल्या मित्रासाठी अक्षरश: जिवाची बाजी लावली. आपणं आपला जीव धोक्यात घालतोय, याचा त्याला विचारही आला नाही. केवळ मित्राचा जीव वाचविण्यासाठी तो उभा राहिला. कोरबा येथे मैत्री दिवशी जिवाची बाजी लावत एका अल्पवयीन तरुणाने मित्राचा जीव वाचवला. ही घटना  परसाखोला बांध येथील आहे. हे ही वाचा-बुलेटवर बसून प्रेमी जोडप्याचे अश्लील चाळे; अडवून गावकऱ्यांनी अशी केली अवस्था मित्राला वाचवण्यासाठी जेव्हा या तरुणाने पाण्यात उडी मारली, त्यानंतर तो जखमी झाला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. संकटाच्या काळात हात देतो तोच खरा मित्र, ही म्हण येथे तंतोतंत लागू होते. पाण्याचा प्रवाह वाढला असल्याने त्याचे मित्र पाण्यात अडकून पडले होते. इतके की त्यांना हलताही शक्य नव्हतं. जरा तरी पाय घसरला असता तर ते पाण्याच्या प्रवाहासोबत वाहून गेले असते. मात्र या तरुणाने पाण्यात उडी मारुन त्यांना दरीत वाहून जाण्यापासून वाचवलं. हा अल्पवयीन तरुण पाण्यात उतरल्यानंतर त्याचे अनेक मित्र वाचविण्यासाठी पुढे आले. सर्वांनी एकत्र येऊन या तरुणाचा जीव वाचवला आहे.
  Published by:Meenal Gangurde
  First published: