• Home
 • »
 • News
 • »
 • viral
 • »
 • मोमोज खाताना तरुणाचं दुचाकीवरुन केलं अपहरण; पोलिसही शॉक, पाहा VIDEO

मोमोज खाताना तरुणाचं दुचाकीवरुन केलं अपहरण; पोलिसही शॉक, पाहा VIDEO

दुचाकीवरुन कसं काय कोणाचं अपहरण केलं जाऊ शकतं, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

 • Share this:
  लखनऊ, 18 नोव्हेंबर : मथुरामधील कोसी कलामध्ये मेन बाजारात मोमोज खात असताना एका 20 वर्षीय तरुणाचं दोन मोटरसायकल स्वारांनी अपहरण (Kidnapped) केल्याचा प्रकार समोर आला आहे. हा तरुण रस्त्याजवळ मोमोज खात होता. दरम्यान त्याचं दुचाकीवर बसून अपहरण करण्यात आलं. या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. त्यात दुचाकीवरुन कसं काय कोणाचं अपहरण केलं जाऊ शकतं, असा सवाल उपस्थित केला जात आहे.(Uttar Pradesh News) या घटनेला 15 तासांहून अधिक काळ लोटला तरी अद्याप तरुण सापडला नाही. ही घटना भर बाजारात घडली. हा सर्व प्रकार समोरील दुकानाच्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. सर्वांदेखत मुलाचं अपहरण झाल्यामुळे कायदा, सुव्यवस्थेबद्दल सवाल उपस्थित केला जात आहे. त्यामुळे पोलिसांकडून आरोपींचा शोध केला जात आहे. (Young man abducted from a bike while eating momos Police also shocked see VIDEO) या प्रकरणाबाबत पीडितेच्या आईने सांगितलं की, त्यांचा मुलगा बाजारात मोमोज खात होता. त्यावेळी दोन बाईक स्वार आले व त्यांनी मुलाशी काहीतरी बातचीत केली, आणि त्याला जबरदस्तीने दुचाकीच्या मागे बसवून घेऊन गेले. महिलेने मुलाच्या अपहरणाबाबत पोलिसात तक्रार दाखल केली आहे. हे ही वाचा-Girlfriend ला प्रजोप करताना अचानक गेली लाईट, नंतर झालं भलतंच मात्र अद्याप मुलाबाबत कोणतीच माहिती मिळू शकलेली नाही. यामुळे परिसरात पोलिसांबद्दल राग व्यक्त केला जात आहे. तर दुसरीकडे तरुणाच्या आईची रडून रडून भयंकर अवस्था झाली आहे. मुलाचा शोध घेण्यासाठी ती पोलिसांकडे सतत विनवणी करीत आहे. विशेष म्हणजे दुचाकीवर अपहरण कसं होऊ शकतं असादेखील सवाल उपस्थित केला जात आहे. काही प्रतिक्रियांनुसार, तरुणाला भीती दाखवून सोबत घेऊन जाण्यात आलं असावं असा संशय व्यक्त केला जात आहे. भरबाजारात ही घटना घडल्यामुळे पोलिसांकडून कडक कारवाई केली जात आहे. मात्र अद्याप कोणतीही माहिती हाती लागू शकलेली नाही.
  Published by:Meenal Gangurde
  First published: