• Home
 • »
 • News
 • »
 • viral
 • »
 • दिमाखात स्टंट करायला गेलेल्या तरुणीसोबत घडलं भलतंच; झाली वाईट अवस्था, पाहा VIDEO

दिमाखात स्टंट करायला गेलेल्या तरुणीसोबत घडलं भलतंच; झाली वाईट अवस्था, पाहा VIDEO

व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल (Stunt Video of a Girl) होत आहे. यात दिसतं की एका तरुणीसोबत अतिशय मजेशीर घटना घडते.

 • Share this:
  नवी दिल्ली 07 नोव्हेंबर : आजकाल प्रत्येक तरुण व्यक्तीला काहीतरी वेगळं करण्याची इच्छा असते. या गोष्टीबद्दल त्यांना एक वेगळाच उत्साह असतो. यासंबंधीचे अनेक व्हिडिओही सोशल मीडियावर (Social Media) पाहायला मिळतात. यातील काही व्हिडिओ भरपूर व्हायरल (Viral Videos) होतात. यातील काही व्हिडिओ मजेशीर असतात तर काही हैराण करणारे. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल (Stunt Video of a Girl) होत आहे. यात दिसतं की एका तरुणीसोबत अतिशय मजेशीर घटना घडते. हा व्हिडिओ (Funny Stunt Video) जितका मजेशीर आहे तितकाच हैराण करणाराही आहे. Digital India कडे वाटचाल! नंदीबैलाच्या डोक्यावर UPI, महिंद्रांनी शेअर केला VIDEO व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतं, की एक तरुणी घाणेरड्या पाण्याच्या नाल्यावर स्टंट करण्याचा प्रयत्न करते. मात्र, मध्येच तिचा बॅल्नस बिघडतो आणि यानंतर तिच्यासोबत जे घडतं ते पाहून सर्वांनाच हसू येतं. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, की एक तरुणी हातात काठी घेऊन नाल्याजवळ उभा असते. इतक्यात दुसरी तरुणी धावत तिथे येते आणि या काठीच्या सहाय्याने नाला क्रॉस करण्याचा प्रयत्न करते. मात्र, अचानक तिचा बॅलन्स बिघडतो आणि ती थेट नाल्यात कोसळते. या तरुणीची अवस्था पाहून तिथे उपस्थित तिचे मित्र जोरजोरात हसू लागतात. नाल्यातून बाहेर आल्यानंतर या तरुणीची अवस्था अत्यंत वाईट झाल्याचं पाहायला मिळतं. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून लोक यावर निरनिराळ्या प्रतिक्रियाही देत आहेत. हा व्हिडिओ 50 हजारहून अधिकांनी पाहिला आहे. तर एक हजारहून अधिकांनी हा व्हिडिओ लाईक केला आहे. कोट्यवधींची उलाढाल! 10 लाखाला 'शाहरूख'ची विक्री, 'सलमान'ची बोली लागली 7 लाखाला व्हायरल होणारा हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर शेअर केला गेला आहे. एका यूजरनं या व्हिडिओवर कमेंट करत लिहिलं, की जे लोक स्मार्ट बनण्याचा प्रयत्न करतात, त्यांच्यासोबत असंच होतं. तर काहींनी या तरुणीसाठी चिंता व्यक्त केली आहे. याशिवाय इतरही अनेकांनी यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत.
  Published by:Kiran Pharate
  First published: