• Home
 • »
 • News
 • »
 • viral
 • »
 • 23 वर्षीय तरुणासोबत 91 वर्षाच्या वृद्धेनं केलं लग्न; हनिमूनला जाताच झाला महिलेचा मृत्यू अन्..., प्रकरणाला भलतंच वळण

23 वर्षीय तरुणासोबत 91 वर्षाच्या वृद्धेनं केलं लग्न; हनिमूनला जाताच झाला महिलेचा मृत्यू अन्..., प्रकरणाला भलतंच वळण

या नात्यात 91 वर्षाच्या एका महिलेनं 23 वर्षाच्या मुलासोबत लग्न (Old Lady Married with Young Boy) केलं. मात्र, हनिमूनच्या दिवशीच असं काही घडलं जे ऐकून सगळेच शॉक झाले.

 • Share this:
  नवी दिल्ली 19 नोव्हेंबर : प्रेम ही जगातील सर्वात सुंदर भावना असल्याचं म्हटलं जातं. जेव्हा तुम्ही एखाद्याच्या प्रेमात पडता तेव्हा चूक आणि बरोबर यातला फरकही विसरून जाता. अनेक अनोख्या प्रेम कथा (Weird Love Story) सतत चर्चेत असतात. सध्या अशीच एक अनोखी लव्ह स्टोरी समोर आली आहे. जिनं सर्वांनाच हैराण केलं आहे. या नात्यात 91 वर्षाच्या एका महिलेनं 23 वर्षाच्या मुलासोबत लग्न (Old Lady Married with Young Boy) केलं. मात्र, हनिमूनच्या दिवशीच असं काही घडलं जे ऐकून सगळेच शॉक झाले. सहसा कपलच्या वयात तीन ते चार वर्षाचं अंतर असणं योग्य मानलं जातं. मात्र या कपलच्या वयात 68 वर्षाचं अंतर होतं. आम्ही बोलत आहोत अर्जेंटिनामध्ये राहणाऱ्या 91 वर्षाच्या महिलेबद्दल. ही महिला आपल्या मैत्रिणीच्या घरी राहत असे. महिलेच्या मैत्रिणीच्या घरी तिचा मैत्रिणीचा 23 वर्षाचा मुलगाही राहात होता. 91 वर्षाच्या या महिलेच्या मैत्रिणीची आर्थिक स्थिती चांगली नसल्याने ही महिला तिला आपल्या पेन्शनच्या पैशातून आर्थिक मदत करत असे. मात्र यादरम्यानच ९१ वर्षाच्या या महिलेनं आपल्या मैत्रिणीच्या २३ वर्षीय मुलासोबत लग्नगाठ बांधली. हे लग्न प्रेमात पडल्यामुळे केलं गेलं नव्हतं तर यामागे पैसा ही सर्वात महत्त्वाची बाब होती. महिलेला आपल्या मैत्रिणीच्या मुलाची मदत आपल्या मृत्यूनंतरही करायची होती. महिलेला पेन्शन मिळत असल्याने ती याच पैशातून आपल्या मैत्रिणीच्या मुलाची शिक्षणासाठी मदत करत असे. मात्र मृत्यूनंतर तिला हे शक्य नव्हतं. अशात या महिलेनं डोकं चालवलं. तिनं आपल्या मैत्रिणीच्या मुलाला लग्नासाठी प्रपोज केलं. दोघींनी लग्न केल्या मैत्रिणीच्या मुलाला या महिलेच्या मृत्यूनंतर तिची पेन्शन मिळणार होती (Marriage for Pension). मात्र हे प्रकरण यानंतर वेगळ्याच दिशेनं गेलं. महिलेनं मैत्रिणीच्या मुलासोबत लग्न केलं. यानंतर दोघं हनिमूनसाठी गेले. मात्र, तिथेच दुर्घटना घडली आणि हनिमूनला गेलेली असतानाच या महिलेचा मृत्यू झाला. महिलेच्या मृत्यूनंतर जेव्हा या तरुणाने पेन्शनसाठी क्लेम केलं तेव्हा पेन्शन अधिकाऱ्यांनी त्याच्यावरच फसवणूकीचा आरोप केला. अधिकाऱ्यांनी या तरुणावर पेन्शनसाठी लग्न केल्याचा आरोप करत त्याला तुरुंगात पाठवण्याची तयारी सुरू केली. या मुलाला पेन्शन तर मिळाली नाहीच मात्र तुरुंगात जाण्याची वेळ त्याच्यावर आली. नंतर अनेक प्रयत्नातून त्याला तुरुंगातून बाहेर काढण्यात आलं.
  Published by:Kiran Pharate
  First published: