मराठी बातम्या /बातम्या /Viral /

इथं घर नाही तर अख्खं गावाच मिळतंय भाड्याने, तेही फक्त 1000 रुपयांत

इथं घर नाही तर अख्खं गावाच मिळतंय भाड्याने, तेही फक्त 1000 रुपयांत

गाव

गाव

अनेकांना फिरायला खूप आवडतं, काही जण तर जग फिरण्यासाठीच पैसे कमवतात. दरवर्षी नवीन देशात जायचं, तिथली विविध ठिकाणं फिरायचं आणि भरपूर मज्जा करायची.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

नवी दिल्ली, 25 नोव्हेंबर : अनेकांना फिरायला खूप आवडतं, काही जण तर जग फिरण्यासाठीच पैसे कमवतात. दरवर्षी नवीन देशात जायचं, तिथली विविध ठिकाणं फिरायचं आणि भरपूर मज्जा करायची. पण फिरायचं म्हटलं की तुमचा ट्रॅव्हल प्लॅन तयार असावा लागतो. अगदी तिकीट बुक करण्यापासून ते ज्या-ज्या ठिकाणी भेट द्यायची आहे, त्या ठिकाणी राहण्यासाठी हॉटेल किंवा रिसॉर्टमध्ये रुम बुक करण्यापर्यंत तयारी करावी लागते. जेणेकरून तिथे गेल्यावर थांबायचं कुठे हा प्रश्न पडणार नाही. अलीकडच्या काळात पर्यटन महागलंय, जाण्यायेण्याच्या खर्चापेक्षा राहण्याचा खर्च खूप जास्त येतो, एका खोलीचं एका दिवसाचं किमान भाडं काही हजारांमध्ये असतं. अशातच एक गाव फक्त एक हजार रुपयांत भाड्याने मिळतंय. होय, तुमचा कानावर विश्वास बसत नसेल, पण हे खरंय. या संदर्भात ‘टीव्ही 9 हिंदी’ने वृत्त दिलंय.

इतक्या स्वस्त दरात भाड्याने मिळणारं हे गाव भारतात नाही, तर इटलीमध्ये आहे. इटालियन गाव पेत्रितोली हे फक्त 1000 रुपये प्रतिरात्र भाड्याने मिळत आहे. विशेष बाब म्हणजे या गावात स्विमिंग पूल, किल्ले, रेस्टॉरंट, बार इत्यादी सर्व सुविधा उपलब्ध आहेत. हे गाव इटलीची राजधानी रोमपासून अवघ्या काही तासांच्या अंतरावर आहे. या गावात सध्या जो किल्ला आहे, तिथल्या महालात राहण्याची शाही व्यवस्था आहे. इथे राहिल्यावर तुम्हाला तुम्ही राजा-महाराजा असल्यासारखा फील येईल.

हेही वाचा -  `या` कारणामुळे गर्लफ्रेंडने रागाच्या भरात पेटवलं बॉयफ्रेंडचं घर; दुर्घटनेत 40 लाखांचं नुकसान

या गावात राहण्यासाठी व्यवस्था असलेल्या ठिकाणी सुमारे 200 लोक आरामात राहू शकतात. इथं एकूण 98 खोल्या आहेत. ‘द सन’च्या रिपोर्टनुसार, जर 150 लोक इथं 6 रात्री राहतील, तर त्याचा एकूण खर्च जवळपास 10 लाख रुपये असेल, म्हणजेच एका रात्रीसाठी एक व्यक्ती 1000 रुपये खर्च करेल.

दरम्यान, इटलीतील हे एकमेव ठिकाण नाही, जिथे अशी ऑफर दिली जात आहे. येथील Presicce शहरात लोकांनी कायमस्वरुपी राहायला यावं म्हणून सरकारकडून घरे विकत घेण्याचा मोबदला म्हणून 25 लाख रुपये दिले जात आहेत. इथलं पर्यटन वाढावं आणि त्याचा हातभार अर्थव्यवस्थेला लागावा, म्हणून तिथल्या स्थानिक प्रशासनाकडून विविध प्रकारच्या उपाययोजना राबवल्या जात आहेत. त्याचाच भाग म्हणून पर्यटकांना गाव भाड्याने घेण्याची सोयही उपलब्ध करून देण्यात आली आहे. डबघाईला आलेली अर्थव्यवस्था सुधारावी, यासाठी स्थानिक प्रशासन सातत्याने प्रयत्न करत आहे. त्यातून पर्यटकांसाठी आणि गावात कायमस्वरुपी राहायला येऊ इच्छिणाऱ्या लोकांसाठी विविध ऑफर्स दिल्या जात आहेत.

First published:

Tags: Viral, Viral news