OMG! ...आणि पाहता पाहता 20 फूट अजगरानं गिळला मोर, VIDEO VIRAL

OMG! ...आणि पाहता पाहता 20 फूट अजगरानं गिळला मोर, VIDEO VIRAL

  • Share this:

यमुनानगर, 01 जून : साप आणि तेही अजगर म्हटलं की आपल्या काळजात धस्स होतं. गेल्या काही दिवसांमध्ये रात्री पाऊस आणि दिवसा होणाऱ्या उष्णतेमुळे माणसांप्रमाणेच प्राणी आणि सर्पांनाही त्रास होऊ लागल्यानं बाहेर येत आहेत. दुपारच्या तळपत्या उन्हा कडकडून भुक लागलेल्या 20 फूट लांब अजगरानं मोराला गिळल्याचा धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे.

उन्हामुळे सावलीच्या शोधात फिरत असलेल्या मोरावर झाडीत असलेल्या अजगरानं हल्ला केला आणि पाहता पाहता त्याला गिळंकृत केलं. अजगरानं मोराची केलेली शिकार कॅमेऱ्यात कैद झाली आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

माजी सरपंच मान सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार शिवा मंदिराजवळ एक 20 फुटांचा अजगर बाहेर आला. त्यानं डोळ्या देखत त्यानं मोराला गिळलं. हा संपूर्ण प्रकार पाहून ग्रामस्थांमध्ये खळबळ उडली. त्यांनी तत्काळ पोलिसांनी या संदर्भात पोलिसांनी माहिती दिली. वन विभागाच्या टीमनं मात्र अजगर तिथून निघून गेला होता. अजगर न सापडल्यामुळे ग्रामस्थांच्या मनात भीती आहे.

हे वाचा-...आणि लिफ्टच्या दरवाजाला लटकली चिमुरडी; काळजाचा ठोका चुकवणारा VIDEO व्हायरल

हे वाचा-राणू मंडल नंतर व्हायरल होतंय या गायकाचा VIDEO, गायलं बाहुबलीतील सर्वात कठीण गाणं

संपादन- क्रांती कानेटकर

First published: June 2, 2020, 8:13 AM IST

ताज्या बातम्या