दोन उंदरांमध्ये रंगला WWE चा अनोखा सामना; VIDEO शेअर करीत IAS अधिकारी म्हणाले...

दोन उंदरांमध्ये रंगला WWE चा अनोखा सामना; VIDEO शेअर करीत IAS अधिकारी म्हणाले...

हा व्हिडीओ मोठ्या संख्येने पाहिला जात असून यावर विविध प्रकारच्या प्रतिक्रियाही येत आहेत

  • Share this:

नवी दिल्ली, 6 नोव्हेंबर : भारतात WWE खूप पसंत केलं जातं. भारतीय चाहत्यांनी लहानपणी भाऊ आणि मित्रांसोबत घरात प्रोफेश्नल अंदाजात कुस्ती खेळली असेल. मात्र यंदा दोन उंदरांमध्ये अनोख्या पद्धतीने फाइट पाहायला मिळत आहे. याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर खूप (Social Media) व्हायरल (Viral Video) होत आहे. हा व्हिडीओ पाहताना तुम्हाला हसू आवरणार नाही. किराण्याच्या दुकानात दोन उंदीर एकमेकांसोबत मारामारी करीत होते. (Rats Fight In Provision Store) इंटरनेटवर हा व्हिडीओ खूप पसंत केला जात आहे.

व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, दुकानातील एका शेल्फच्या वर दोघांची लढाई सुरू आहे. त्यांच्या आजूबाजूला सामान ठेवण्यात आलं आहे. या व्हिडीओच्या मागे डब्लूडब्ल्यूईची कॉमेंट्री सुरू आहे आणि दुकानातील वरील शेल्फवर दोघांची मारामारी सुरू आहे. हा व्हिडीओ आयएएस अधिकारी अवनिष शरण यांनी शेअऱ केला आहे. व्हिडीओ शेअर करताना त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिलं आहे, नेक-टू-नेक सुरू आहे.

हे ही वाचा-दिवाळीआधी दोन मजुरांचं नशीब फळफळलं! खोदकाम करताना सापडले 2 मौल्यवान हिरे

अवनीष यांनी हा व्हिडीओ 6 नोव्हेंबर रोजी सकाळी शेअर केला होता. आतापर्यंत 25 हजारांहून जास्त जणांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. सोबतच 2 हजारांहून अधिक लाइक्स आणि 250 हून जास्त रि-ट्विट करण्यात आले आहे. लोकांना ही फाइट खूप आवडत आहे. लोकांनी या व्हिडीओवर मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Published by: Meenal Gangurde
First published: November 6, 2020, 6:10 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading