लंडन, 27 सप्टेंबर : इस्ट लंडनमध्ये (East London) टॉयलेट सीटवर लिहिलेल्या कोट्समुळे एका कॅफेला ट्रोलिंगचा सामना करावा लागला आहे. कॅफेच्या टॉयलेट सीटवर लिहिलं होतं, 'हसत राहा, तुमचं वजन कमी होत आहे.' हा कोट पाहून एनोरेक्सिया आजारातून बरी झालेल्या महिलेल्या जबर धक्का बसला, यासंदर्भातील अनुभव तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे. यानंतर कॅफेच्या मालकाला लोकांची बोलणी ऐकावी लागला आहे.
नोट्सने महिलेला बसला धक्का...
डेलीमेलीच्या रिपोर्टनुसार, सियान ब्रॅडली नावाची महिला इस्ट लंडनमध्ये ब्रिक लेनजवळ विंटेज रूम्स कॅफेमध्ये (Vintage Rooms Cafe) गेली होती. जेव्हा ती शौचालयात गेली तेथील टॉयलेट सीटवर लिहिलं होतं, हसा, तुमचं वजन कमी होत आहे. ब्रॅडलीने सांगितलं की, मी एनोरेक्सियामधून आता कुठे बरी झाली आहे. आणि त्यात अशी नोट पाहिल्यानंतर मी घाबरले. आणि मला राग आला.
काय आहे एनोरेक्सिया?
एनोरेक्सिया (Anorexia) एक मानसिक आजार आहे. ज्यात व्यक्ती आपल्या वाढत्या वजनाबाबत अधिक विचार करीत राहते. अशा लोकांना वाटतं की, जर त्यांनी जेवण जरी केलं, तरी जाड होती. यामुळे ते खाणं कमी करतात. तर जेवणाची वेळही चुकीची होत जाते. अशात लोक डायटिंगसह अधिक व्यायामदेखील करतात. अनियमत जेवण आणि कमी खाल्ल्यामुळे त्यांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो.
हे ही वाचा-अभिनेत्रीचा विचित्र रेकॉर्ड; एका दिवसात 300 पुरुषांसोबत शारिरीक संबंध, वर म्हणते
ब्रॅडलीच्या पोस्ट वर सोशल मीडिया युजर्सनी नाराजी व्यक्त केली आहे. एका युजरने लिहिलं आहे की, हे भयंकर आहे. तर दुसऱ्या एका युजरने लिहिलं आहे की, हे चुकीचं आहे.
वादानंतर कॅफेने दिलं स्पष्टीकरण..
वाद वाढल्यानंतर विंटेज रूम्सने (Vintage Rooms) वक्तव्य जारी केलं आहे. यात त्यांनी लिहिलं आहे की, आम्हाला याबाबत माहिती मिळाली असून, टॉयलेट सीटवरुन कोट्स हटविण्यासाठी कारवाई करण्यात आली आहे. मात्र तेथे अनेक सकारात्मक संदेश देखील देण्यात आले आहेत. आम्ही आमच्या कोणत्याच ग्राहकाला त्रास देऊ इच्छित नाही. वास्तवात पाहिलं तर संपूर्ण कॅफेत पॉझिटिव्ह कोट्स लिहिले आहेत.
कॅफेने पुढे लिहिलं आहे की, आम्ही यामुळे जर कोणाला त्रास झाला असेल तर क्षमा मागतो. कोणाला त्रास देण्याचा आमचा हेतू नव्हता. आम्ही एनोरेक्सियाशी पीडित कोणत्याही व्यक्तीला त्रास देऊ इच्छित नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: London