मराठी बातम्या /बातम्या /Viral /

'14 ऑगस्ट रोजी हाहाकार माजणार, बळी जाणार', Time Traveller चा भयावह दावा

'14 ऑगस्ट रोजी हाहाकार माजणार, बळी जाणार', Time Traveller चा भयावह दावा

2090 सालातून परतल्याचा दावा करणाऱ्या टाइम ट्रॅव्हरलचा भयावह दावा.

2090 सालातून परतल्याचा दावा करणाऱ्या टाइम ट्रॅव्हरलचा भयावह दावा.

2090 सालातून परतल्याचा दावा करणाऱ्या टाइम ट्रॅव्हलरने काही दिवसांतच येणाऱ्या संकटाबाबत जगाला सावध केलं आहे.

  • Published by:  Priya Lad
मुंबई, 11 ऑगस्ट : कोरोना, मंकीपॉक्ससारख्या आजारांशी दोनहात करणारं जग भविष्यात आणखी काय संकट वाढून ठेवलं आहे, याच्याच चिंतेत आहे. अशात अवघ्या काही दिवसांवरच येऊन ठेपलेल्या एका संकटाबाबत सावध करण्यात आलं आहे. स्वतःला टाइम ट्रॅव्हलर म्हणवणाऱ्या एका व्यक्तीने या संकटाबाबत दावा केला आहे. यामुळे संपूर्ण जग दहशतीत आलं आहे. काही लोक असे असतात ते आपण भविष्यातून जाऊन आल्याचा दावा करतात. त्यांना टाइम ट्रॅव्हलर म्हटलं जातं. अशाच एका टाइम ट्रॅव्हलरने या महिन्यात किंबहुना काही दिवसांत घडणाऱ्या एका घटनेबाबत सांगितलं आहे. ज्यामुळे हाहाकार माजेल, अनेक बळी जातील असा दावा त्याने केला आहे. किम विन्डेल नेक्स नावाचं फेसबुक अकाऊंट आहे. ही व्यक्ती आपण टाइम ट्रॅव्हलर असल्याचं सांगते. आपण 2090 सालातून परतल्याचा दावा त्याने केला आहे. म्हणजे भविष्यातील 68 वर्षांत तो जाऊन आला. या आठवड्यात घडणाऱ्या घटनेबाबत त्याने पाहिलं आहे. टाइम ट्रॅव्हलर फेसबुक पेजवर ही पोस्ट शेअर करण्यात आली आहे. 14 ऑगस्ट 2022 रोजी इतिहासातील सर्वात खतरनाक चक्रिवादळ अमेरिकेला धडकणार आहे. यात अनेक लोकांचा जीव जाईल. साऊथ कॅरोलिनाला याचा सर्वात जास्त फटका होईल.  6 चक्रिवादळ दक्षिण कॅरोलिनात येतील. ज्यांचा वेग 250 मैल प्रति तास असेल. यामुळे हाहाकार माजेल. हे वाचा - वितळत्या हिमनदीमुळे उघड झालं 54 वर्षांपूर्वीचं रहस्य, मानवी हाडांसोबत मिळाला विमानाचा सांगाडा काही जण या भविष्यवाणीमुळे घाबरले आहेत तर काहींनी ही फक्त अफवा असल्याचं म्हटलं आहे. तुम्हाला याबाबत नेमकं काय वाटतं ते आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया देऊन आम्हाला नक्की सांगा.
First published:

Tags: Viral

पुढील बातम्या