जगातल्या सगळ्यात मोठ्या इमारतीवर कोसळली वीज, विश्वास बसणार नाही असा PHOTO व्हायरल

जगातल्या सगळ्यात मोठ्या इमारतीवर कोसळली वीज, विश्वास बसणार नाही असा PHOTO व्हायरल

देशामधील सर्वांत उंच इमारत बुर्ज खलीफावर वीज कोसळ्याचा एक फो़टो समोर आला आहे. हा सुंदर फोटो एका फोटोग्राफरने अतिशय उत्तमरित्या कॅमेऱ्यात कैद केला आहे.

  • Share this:

अबूधाबी, 14 जानेवारी : दुबईमध्ये मागच्या तीन दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे. या पाऊसामुळे शहरामधील अनेक भागांत पाणी साचलं असून नागरिकांचे हाल होत आहेत. अबूधाबी आणि शारजाह या शहरांमध्येही मुसळधार पाऊस सुरू आहे. यात एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. देशामधील सर्वांत उंच इमारत बुर्ज खलीफावर वीज कोसळ्याचा एक फो़टो समोर आला आहे. हा सुंदर फोटो एका फोटोग्राफरने अतिशय उत्तमरित्या कॅमेऱ्यात कैद केला आहे.

फोटोग्राफर जोहैब अंजुम हा गेल्या 7 वर्षांपासून परक्टेक क्लिकची वाट पाहत होता. जेव्हा केव्हाही राजस्थानमध्ये पाऊस पडत तेव्हा जोहैब आपला कॅमेरा घेऊन बुर्ज खलीफा या इमारतीच्या समोर येऊन बसायचा. अखेर त्याने एक अप्रतिम फोटो काढला. मुसळधार पावसात विजांचा कडकडाट सुरू होता. बुर्ज खलीफा इमारतीवरही एक वीज कडाडली आणि हे दृश्य जोहैबने  कॅमेरात कैद केले. शुक्रवारी जोहैबचं स्वप्न पूर्ण झालं अशी प्रतिक्रिया त्याने माध्यमांना दिली आहे.

View this post on Instagram

#Lightning hotspot

A post shared by Fazza (@faz3) on

2,720 फीट उंची असलेल्य़ा इमारतीवरुन वीज चमकण्याचे हे दुश्य सध्या जगभर व्हायरल होत आहे. हे दृश्य आपल्या कॅमेरामध्ये कैद केल्यानंतर, फोटोग्राफर जोहैब म्हणाला की, 'देवाने हा क्षण प्लान केला होता. वीज बुर्ज खलीफावर पडली या दृश्याने 2020 ची सुरुवात ही खूप सुंदर प्रकारे झाली '

खरंतर, या फोटोसाठी जोहैब हा एकटाच भाग्यशली नव्हता तर अनेकांनी हा क्षण त्यांच्या कॅमेरामध्ये कैद केला. दुबईमधील क्राऊन प्रिंस, शेख हमदान यांनीसुद्धा ते दृश्य आपल्या कॅमेरामध्ये कैद केले. त्यादिवशी जोरदार पाऊस पडत होता. मागच्या वेळेस असा पाऊस 1996 मध्ये पडला होता.

Published by: Renuka Dhaybar
First published: January 14, 2020, 3:47 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading