मराठी बातम्या /बातम्या /Viral /

'या' देशात किड्यांना आकर्षित करण्यासाठी खेळवली जाते ‘वर्ल्ड वर्म चार्मिंग चॅम्पियनशिप’

'या' देशात किड्यांना आकर्षित करण्यासाठी खेळवली जाते ‘वर्ल्ड वर्म चार्मिंग चॅम्पियनशिप’

जगात विविध प्रकारचे खेळ खेळले जातात. त्यातले काही विचित्रही असतात. यापैकी एक विचित्र गेम, ज्याला गेम ऑफ चार्मिंग वर्म्स (Game of Charming Worms) असंही म्हणतात, तो ब्रिटनमध्ये खेळला जातो.

जग (World) जेवढं मोठं आहे तितक्याच वेगवेगळ्या प्रकारचे नागरिक जगभरात राहतात. काही गोष्टी समान असतात, तर काही वेगळ्या असतात. त्यामुळे जगातल्या वेगवेगळ्या भागांमध्ये अनेक विचित्र गोष्टी पाहायला मिळतात. आपल्याला विचित्र (Weird Things) वाटणारी गोष्ट त्यांच्यासाठी सामान्य असते. जगात अनेक विचित्र खेळही खेळले जातात. आज आम्ही तुम्हाला अशाच एका खेळाबद्दल सांगणार आहोत, जो ब्रिटनमध्ये खेळला जातो. आजपर्यंत असा खेळ तुम्ही कधीच पाहिला नसेल किंवा ऐकला नसेल. जगात विविध प्रकारचे खेळ खेळले जातात. त्यातले काही विचित्रही असतात. यापैकी एक विचित्र गेम, ज्याला गेम ऑफ चार्मिंग वर्म्स (Game of Charming Worms) असंही म्हणतात, तो ब्रिटनमध्ये खेळला जातो. साधारणपणे ज्या कीटकांना, किड्यांना आपण पळवून लावतो, त्यांना या खेळात खेळाडू आपल्याजवळ बोलावतात. या वर्षी या खेळासाठी खेळाडूंना खूप मेहनत घ्यावी लागली. कारण ब्रिटनमध्ये (United Kingdom) या मोसमात कडक उन्हाचा तडाखा बसतोय आणि जमीन कोरडी पडली आहे. कसा खेळला जातो हा अनोखा खेळ? या खेळासाठी यूकेच्या अनेक भागांमध्ये चॅम्पियनशिप आयोजित केल्या जातात. त्या ‘वर्ल्ड वर्म चार्मिंग चॅम्पियनशिप’ म्हणून ओळखल्या जातात. या गेममध्ये स्पर्धकांना 2 चौरस मीटरचा प्लॉट दिला जातो, त्यामध्ये गवत असतं. त्या गवतामध्ये लपलेल्या कीटकांना आकर्षित करण्यासाठी स्पर्धक वेगवेगळ्या युक्त्या वापरतात. पाणी देणं, नाचणं, ड्रम वाजवणं अशा अॅक्टिव्हिटीज केल्या जातात. 1980 मध्ये कॉर्नवॉल इथल्या ड्रॅकेना सेंटरमध्ये (Dracaena Centre) हा खेळ पहिल्यांदा खेळला गेला होता. (महिलांना लॉंग कोविड होण्याची शक्यता अधिक; संशोधनात दिसून आली 'ही' लक्षणं) यंदा उन्हामुळे खेळात अडचणी हा खेळ खेळण्यासाठी स्पर्धकांना अर्धा तास दिला जातो. त्या अर्ध्या तासांत स्पर्धकांनी त्या कीटकांना स्वतःकडे आकर्षित करायचं असतं. स्पर्धकांना माती खोदण्याची किंवा कोणतंही उपकरण वापरण्याची परवानगी नसते. सामान्यपणे किडे जमिनीवर उडी मारण्याची व्हायब्रेशन्स ऐकून किंवा पाण्याचे शिंतोडे पडल्यावर बाहेर पडतात. त्यामुळे स्पर्धक जमिनीवर थापा मारून, संगीत वाजवून आणि गवताशी चिकटणाऱ्या वस्तू टाकून कीटकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करतात. यंदा उष्णता जास्त असल्याने स्पर्धकांना फक्त एकच किडा शोधता आला. स्पर्धेनंतर हे किडे परत गवतात सोडले जातात. जवळपास 40 वर्षांपासून सुरू असलेल्या या स्पर्धेत 2009 मध्ये सर्वाधिक 567 कीटक स्पर्धकांना शोधता आले होते.
First published:

पुढील बातम्या