Home /News /viral /

डिफ्यूज करतानाच झाला 5 हजार किलो बॉम्बचा स्फोट, संपूर्ण शहर हादरलं; पाहा थरारक VIDEO

डिफ्यूज करतानाच झाला 5 हजार किलो बॉम्बचा स्फोट, संपूर्ण शहर हादरलं; पाहा थरारक VIDEO

या स्फोटाच्या व्हिडीओत असे दिसून येत आहे की कालव्याच्या आत एक प्रचंड लाट उसळली आणि त्सुनामीसारखा प्रकार घडला.

    वर्झावा, 14 ऑक्टोबर : पोलंडमध्ये 75 वर्षीय जुन्या विध्वंसक बॉम्बचा सोमवारी स्फोट झाला. हा बॉम्ब निकामी करत असताना हा स्फोट झाला. ब्रिटनच्या रॉयल एअर फोर्सने 1945 साली दुसर्‍या महायुद्धादरम्यान (WW II) पोलंडमधील ब्रिटनच्या रॉयल एअर फोर्सने 'टॉलबॉय किंवा भूकंप' (Tolboy Earthquake)नावाचा 5400 किलोचा हा बॉम्ब टाकला होता. या बॉम्बला डिफ्यूज करण्यासाठी 750 लोकांना दूर घेऊन जाण्यात आले होते. मात्र निकामी करत असतानाच याचा स्फोटो झाला. या स्फोटाचा व्हिडीओ समोर आला आहे. पोलंडच्या नौदलाच्या वृत्तानुसार दुसर्‍या महायुद्धाच्या वेळेस दोन मोठे बॉम्ब सापडले होते. हा बॉम्ब निकामी करण्यासाठी त्याला प्रथम बाल्टिक समुद्रात घेऊन गेले. या बॉम्बचा स्फोट होण्याची शक्यता 50-50 होती आणि त्यानंतरही बॉम्ब डिफ्यूज पथकानं हा धोका पत्करला. 1945 मध्ये झालेल्या हल्ल्यादरम्यान ब्रिटीश हवाई दलाने जर्मन क्रूझरवर टॉलबॉय बॉम्ब टाकला. वाचा-थरारक! चालत्या वॅगन आरनं घेतला पेट, आगीतूनच ड्रायव्हरनं मारली बाहेर उडी पण... दुसर्‍या महायुद्धात हा भाग जर्मनीकडे होता. बीबीसीच्या वृत्तानुसार, बॉम्बच्या स्फोटाचा धक्का शहराच्या इतर भागातही जाणवला. या स्फोटाच्या व्हिडीओत असे दिसून येत आहे की कालव्याच्या आत एक प्रचंड लाट उसळली आणि त्सुनामीसारखा प्रकार घडला. हा बॉम्ब किती विध्वंसक होता याचा अंदाज हा व्हिडीओ पाहिल्यानंतर येतो. वाचा-थेट मगरींसहच अंघोळ करण्याची डेअरिंग; VIDEO पाहा समजेल मग पुढे काय झालं वाचा-5 लाखांना ऑनलाइन विकत घेतली मांजर, बॉक्स उघडला तर त्यात होता वाघाचा बछडा भूकंप नावाच्या या बॉम्बचे वजन 5400 किलो होते आणि त्यात 2400 किलो स्फोटके होती. हा बॉम्ब 12 मीटर खोलीत पाण्याखाली ठेवण्यात आला होता. बॉम्बचा स्फोट झाल्यानंतर जीवितहानी नाही झाल्याचे पोलंडच्या नौदलानं स्पष्ट केले. स्फोट होण्याच्या अगोदर शहरात गॅसचा पुरवठा थांबविण्यात आला होता.
    Published by:Priyanka Gawde
    First published:

    Tags: Video viral

    पुढील बातम्या