मराठी बातम्या /बातम्या /Viral /17 ऑलिम्पिक स्विमिंग पूल्सचं क्षेत्र व्यापणारा जगातला सर्वांत मोठा 'Swimming pool'

17 ऑलिम्पिक स्विमिंग पूल्सचं क्षेत्र व्यापणारा जगातला सर्वांत मोठा 'Swimming pool'

जगातला सर्वांत मोठा आणि सर्वांत खोल स्विमिंग पूल (Biggest & Deepest Swimming Pool) ब्रिटनमध्ये (UK) उभारला जात आहे.

जगातला सर्वांत मोठा आणि सर्वांत खोल स्विमिंग पूल (Biggest & Deepest Swimming Pool) ब्रिटनमध्ये (UK) उभारला जात आहे.

जगातला सर्वांत मोठा आणि सर्वांत खोल स्विमिंग पूल (Biggest & Deepest Swimming Pool) ब्रिटनमध्ये (UK) उभारला जात आहे.

लंडन, 04 जून: जगातला सर्वांत मोठा आणि सर्वांत खोल स्विमिंग पूल (Biggest & Deepest Swimming Pool) ब्रिटनमध्ये (UK) उभारला जात आहे. कॉर्नवॉल (Cornwall) इथल्या ब्लू अॅबिस या जागतिक दर्जाच्या पर्यावरणविषयक प्रशिक्षण केंद्रात हा स्विमिंग पूल तयार होत आहे. तब्बल 42 हजार घनमीटर पाणी या पूलमध्ये राहू शकणार आहे. ऑलिम्पिक स्पर्धेत पोहोण्याच्या 17 स्विमिंग पूलइतकं क्षेत्रफळ हा पूल व्यापणार आहे. 'टाइम्स नाऊ डिजिटल'ने याबद्दलचं वृत्त दिलं आहे.

ब्लू अॅबिस (Blue Abyss) हे जागतिक दर्जाचं पर्यावरणविषयक प्रशिक्षण केंद्र आहे. तब्बल 150 दशलक्ष पौंड एवढी प्रचंड गुंतवणूक करून ते केंद्र उभारण्यात आलं आहे. खोल समुद्रातल्या, तसंच अंतराळातल्या संशोधनासाठी प्रशिक्षण देता यावं आणि वेगवेगळ्या प्रकारच्या चाचण्या घेता याव्यात, या उद्देशाने हे केंद्र उभारण्यात आलं आहे. अंतराळवीर, तसंच संरक्षण, सागरी आणि ऑफशोअर एनर्जी आदी क्षेत्रांतल्या व्यक्तींना इथे प्रशिक्षण दिलं जाणार आहे. 50 मीटर बाय 40 मीटर लांबी-रुंदीचा आणि 50 मीटर खोल असलेला हा नवा स्विमिंग पूल (Swimming Pool) या केंद्राचाच भाग आहे.

पूर्वी सैन्यात असलेले डायव्हिंग इन्स्ट्रक्टर आणि मॅनेजमेंट कन्सल्टंट जॉन विकर्स यांच्या संकल्पनेतून ब्लू अॅबिस हे केंद्र उभारलं जात आहे. अंतराळात प्रवास करणारे पहिले ब्रिटिश अंतराळवीर डॉ. हेलेन शेर्मन यांचा, तसंच टीम पीक यांचंही सहकार्य विकर्स यांना मिळालं आहे. ब्लू अॅबिसमुळे 160 रोजगारांची निर्मिती होणार असून, 80 लाख पौंडांची उलाढाल होणार आहे.

हेही वाचा- VIDEO: PPE किट घालून रुग्णांच्या वॉर्डमध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांचा 'झिंगाट'

'या प्रचंड व्यापक, मात्र तरीही नियंत्रित अशा पर्यावरणाचा अनुभव घेण्यासाठी जगभरातले अंतराळवीर आणि अवकाश क्षेत्रातल्या व्यक्ती इथे येतील. त्यातून त्यांची अंतराळप्रवासातली जोखीम कमी होऊ शकते,' असं डॉ. शेर्मन म्हणतात.

अलीकडेच ब्रिटनमधल्या आणखी एका अनोख्या तलावाविषयीच्या बातम्यांनी सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. ती बातमी होती जगातल्या पहिल्या तरंगत्या आणि पारदर्शक तलावाची (Floating & Transparent Pool).

नैर्ऋत्य लंडनमधल्या (South West London) नाइन एल्म्समधल्या दोन इमारतींच्या 10व्या मजल्यांच्या मध्यभागी हा तलाव तयार करण्यात आला आहे. 50 टन वजनाचं पाणी साठवण्याची क्षमता असलेला हा तलाव 82 फूट लांब असून, जमिनीपासून 115 फूट उंचीवर तरंगत आहे.

First published:
top videos

    Tags: London, PHOTOS VIRAL