हा सीन पाहून तुम्हाला आठवेल Newton's Third Law, चमत्कार की विज्ञान हे VIDEO पाहून ठरवा

हा सीन पाहून तुम्हाला आठवेल Newton's Third Law, चमत्कार की विज्ञान हे  VIDEO पाहून ठरवा

आतापर्यंत हा व्हिडीओ 3 हजारहून अधिक लोकांनी पाहिला आहे. या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकता की बॉक्स खाली पडला तरी तो पुन्हा जसाच्या तसा वर परत गेला आहे.

  • Share this:

मुंबई, 18 डिसेंबर : अनेक वेळा आपल्या आजूबाजूला अनेक गोष्टी घडत असतात पण आपल्याला त्या कधी दिसतात तर कधी दिसत नाहीत. कधीकधी गोष्टी अशा का घडल्या याचं उत्तर देखील मिळत नाही. असाच एक चमत्कार घडला आहे. ही जादू म्हणा विज्ञानाचा चमत्कार म्हणा किंवा अजून काही पण हा व्हिडीओ पाहून तुम्हाला नक्कीच असं कसं घडलं असा आश्चर्याचा धक्का बसणार आहे.

या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकता की ट्रक जात आहे आणि त्याच्यामध्ये अनेक बॉक्स भरले आहेत. तो ट्रक वेगानं पुढे जात असताना त्यातला एक बॉक्स खाली पडतो आणि हवेत उंच उडून पुन्हा ट्रकमध्ये जसाच्या तसा ठेवलेल्या अवस्थेत पुन्हा पडतो. आता तुम्ही म्हणाल हे शक्यच नाही. तर ट्रकच्या मागे असणाऱ्या एक तरुणानं ही घटना कॅमेऱ्यात कैद केली असून त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

हे वाचा-मेंढ्या-बकऱ्यांचा शहरात धुमाकूळ, नागरिकांना केलेल्या मारहाणीचा VIDEO VIRAL

आतापर्यंत हा व्हिडीओ 3 हजारहून अधिक लोकांनी पाहिला आहे. या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकता की बॉक्स खाली पडला तरी तो पुन्हा जसाच्या तसा वर परत गेला आहे. हा व्हिडीओ पोस्ट करताना न्यूटनचा तिसरा सिद्धांत इथे लागू होत असल्याचं कॅप्शनमध्ये उल्लेख करण्यात आला आहे. हा व्हिडीओ पाहून चमत्कार आहे की विज्ञान हे तुम्हीच ठरवा. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

Published by: Kranti Kanetkar
First published: December 18, 2020, 1:46 PM IST
Tags:

ताज्या बातम्या