मराठी बातम्या /बातम्या /Viral /

30 कोटींचं आलिशान घर महिलेने फक्त 2 हजार रुपयांत मिळवलं; नेमकं कसं ते पाहा

30 कोटींचं आलिशान घर महिलेने फक्त 2 हजार रुपयांत मिळवलं; नेमकं कसं ते पाहा

एका महिलेचं नशीब एका रात्रीत पालटलं असून एका लहानशा घरातून थेट अलिशान बंगल्याची ती मालकीण झाली.

एका महिलेचं नशीब एका रात्रीत पालटलं असून एका लहानशा घरातून थेट अलिशान बंगल्याची ती मालकीण झाली.

एका महिलेचं नशीब एका रात्रीत पालटलं असून एका लहानशा घरातून थेट अलिशान बंगल्याची ती मालकीण झाली.

  नवी दिल्ली, 11 एप्रिल : माणसाचं नशीब कसं कधी पालटेल याचा नेम नाही. एका रात्रीत कोणाचं होत्याचं नव्हतं होतं. तर कोणी करोडपती होतं. असंच एका महिलेचं नशीब एका रात्रीत पालटलं असून एका लहानशा घरातून थेट अलिशान बंगल्याची ती मालकीण झाली. ही खरी गोष्ट कॅथरीन कारवाडाइन (Catherine Carwadine) नावाच्या 59 वर्षीय महिलेची आहे. ही महिला हेल्थ डिपार्टमेंटमधून रिटायर्ड झाली. पण रिटायर्ड होण्याआधी ती रुग्णालयात फोस्टर मदर अर्थात आया म्हणून काम करत होती. या महिलेला स्वत:ची पाच मुलं आहे. ती आपल्या मुलांसह आणि पतीसोबत एका लहानशा घरात राहत होती. अशात तिचं नशीब पालटलं आणि रातोरात ती करोडपती झाली.

  हे वाचा - सुसाट BMW ने डिव्हाइडर तोडून स्कूटी चालकाला हवेत उडवलं, भयंकर अपघाताचा थरार VIDEO

  केवळ 2 हजारात मिळालं 30 कोटींचं घर - डेली मेलच्या रिपोर्टनुसार, कॅथरीन कारवाडाइनने व्हॅलेंटाइन्स डेच्या दिवशी 20 पाउंड भारतीय रुपयानुसार जवळपास 2 हजार रुपये खर्च करुन Raffle लॉटरीचं तिकीट घेतलं. तिला या गोष्टींचा अंदाजही नव्हता की तिला लॉटरी लागेल. 1 एप्रिल रोजी तिला लॉटरी लागल्याचं समजलं. ती अतिशय खूश झाली. पण हे एप्रिल फूल असू शकतं असं तिला वाटलं. परंतु नंतर संपूर्ण तपास-पडताळणी केल्यानंतर कॅथरीनला खरोखरचं 30 कोटींचं अलिशान घर जिंकल्याचं (Women Won 30 Crore House in Lottery) समजलं. 2000 रुपयांत खरेदी केलेल्या लॉटरीच्या तिकीटावर तिने घर जिंकलं (Woman Got Big House In Just 2000 rs) होतं.

  हे वाचा - Optical Illusion: तुम्ही खुश आहात की नाही, हा फोटो सांगेल तुमच्या मनातलं सीक्रेट

  कॅथरीन कारवाडाइनला (Catherine Carwadine) लॉटरीत लागलेलं घर अलिशान आहे. घराजवळ एक आर्टिफिशियल तलावही आहे. त्याशिवाय थिएटर, गार्डन, पर्सनल सिनेमा हॉल, जीमसारख्या सुविधा आहेत. घराबाहेर जबरदस्त दृष्य आहे. लॉटरीत लागलेलं हे घर तिला पूर्णपणे मिळाल्यानंतर आता तिला घर भाड्याने देण्यास, घरात राहण्यास आणि विकण्याचाही अधिकार आहे. वयाच्या अशा वळणावर अचानक मिळालेलं हे घर तिच्यासाठी पर्वणीच ठरलं आहे.
  Published by:Karishma
  First published:

  Tags: Lottery, Viral news

  पुढील बातम्या