मराठी बातम्या /बातम्या /Viral /साडी नेसून महिला उतरल्या मैदानात, फूटबॉल खेळतानाचा हटके Video व्हायरल

साडी नेसून महिला उतरल्या मैदानात, फूटबॉल खेळतानाचा हटके Video व्हायरल

व्हायरल

व्हायरल

सोशल मीडियावर अनेक प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. यामध्ये मजेशीर, विचित्र, भयानक, धोकादायक, हटके, आश्चर्यकारक सर्वच प्रकारच्या घटना पहायला मिळतात.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

नवी दिल्ली, 2 एप्रिल : सोशल मीडियावर अनेक प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. यामध्ये मजेशीर, विचित्र, भयानक, धोकादायक, हटके, आश्चर्यकारक सर्वच प्रकारच्या घटना पहायला मिळतात. आपण विचारही करु शकत नाही अशा घटना चर्चेचा विषय ठरतात. सध्या एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे ज्यामध्ये महिलांनी चक्क साडी घालून फूटबॉल खेळला आहे. हा व्हिडीओ सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

सध्या समोर आलेल्या व्हिडीओमध्ये स्पोर्ट्स जर्सीऐवजी महिला साड्या परिधान करताना दिसल्या. व्हिडिओमध्ये महिलांना साडी नेसून फुटबॉल खेळताना पाहून युजर्सना धक्काच बसला होता. हा आश्चर्यकारक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओ व्हायरल होताच व्हिडीओवर भरपूर कमेंटचा वर्षाव पहायला मिळतोय.

द न्यू इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, या महिला संघाची खास गोष्ट म्हणजे या संघातील खेळाडूंचे वय 20 ते 72 वर्षे दरम्यान होते. मिळालेल्या माहितीनुसार, एका अनोख्या फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेला 'गोल इन साडी' असे नाव देण्यात आले. ज्यामध्ये मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर जिल्ह्यातील आठ महिला संघ सहभागी झाले होते. या स्पर्धेत सर्व खेळाडू स्पोर्ट्स जर्सीऐवजी साडी नेसलेले दिसले.

हा व्हिडिओ ब्रजेश राजपूतने ट्विटरवर शेअर केला आहे. जो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्याला 6 हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, सामाजिक कार्यकर्त्या अंजली गुप्ता बत्रा सांगतात की, या स्पर्धेची पुढील आवृत्ती आता पुढील वर्षी होणार आहे. त्याआधीही दतिया जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील महिलांनी पुढील स्पर्धेत प्रवेशासाठी आमच्याशी संपर्क साधला आहे.

First published:
top videos

    Tags: Social media viral, Viral, Viral news, Viral videos