• Home
  • »
  • News
  • »
  • viral
  • »
  • चक्क प्रेशर कुकरमध्ये चपात्या करतेय महिला; एकदा हा VIDEO पाहाच!

चक्क प्रेशर कुकरमध्ये चपात्या करतेय महिला; एकदा हा VIDEO पाहाच!

असाच एक चपाती तयार करण्याच्या नव्या पध्दतीचा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे.

  • Share this:
नवी दिल्ली, 22 मे: नवनवीन खाद्यपदार्थांच्या पाककृती (cuisine) अनेकदा सोशल मीडिया (Social Media) किंवा युट्युबवरुन शेअर केल्या जातात. महिला वर्गाकडून अशा व्हिडीओंना (Video) विशेष पसंती मिळत असते. अनेकजण या पाककृती स्वतःदेखील करुन बघत असतात. सोशल मिडीयामुळे अगदी देशोदेशीच्या वैशिष्ठयपूर्ण डिशेस अगदी घरबसल्या तयार करता येणं शक्य झालं आहे. तसेच स्वयंपाक करताना आवश्यक असलेल्या काही बारीकसारीक गोष्टी देखील सोशल मीडियावर उपलब्ध असल्यानं त्याही महिलांना उपयुक्त ठरत आहेत. असाच एक चपाती तयार करण्याच्या नव्या पध्दतीचा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. चपाती (Chapati) ही बहुतेक भारतीय घरांमध्ये बनवली जाणारी एक सामान्य पाककृती आहे. चपाती बनवण्यासाठी एक पोळपाट, लाटणं आणि लोखंडी तव्याची गरज असते. परंतु,जर एखाद्याकडे तवा उपलब्ध नसला तरी परिपूर्ण चपाती कशी भाजली जाऊ शकते,याचे प्रात्यक्षिक नुकतेच एका महिलेने दाखवलं आहे. याबाबत सोशल मिडीयावर एक व्हिडीओ जोरदार व्हायरल झाला असून,एक महिला प्रेशर कुकरच्या मदतीने चपात्या भाजण्याचे एक अनोखं प्रात्यक्षिक दाखवत असल्याचं या व्हिडीओ मध्ये दिसत आहे. या व्हायरल क्लिपमध्ये एका महिलेने तिच्या स्वयंपाक घरातील गॅसपेटवला असून त्यावर रिकामा कुकर ठेवला आहे. आता तिने गॅसच्या ज्वाळा मोठ्या केल्या आहेत. त्यानंतर त्या महिलेने पोळपाट आणि लाटण्याच्या सहाय्याने 3 चपाती लाटल्या आहेत. त्यानंतर या लाटलेल्या 3 चपाती या महिलेने त्या रिकाम्या प्रेशर कुकरमध्ये ठेवल्याचं दिसतं. त्यानंतर त्या महिलेनं कुकरचं झाकण बंद केलं. हे झाकण घट्ट बंद केल्यानंतर ही महिला व्हिडीओ पाहणाऱ्या दर्शकांना 3 मिनिटं थांबण्याची विनंती करते. हे वाचा-आई-वडिलांना दाखवलेलं लेटर पाहून दोघेही हैराण, 80 लाखांहून अधिक वेळा पाहिला VIDEO काही वेळेनंतर ही महिला प्रेशर कुकरचं(Pressure Cooker)झाकण उघडते. त्यानंतर कुकरमध्ये भाजलेल्या चपात्या ही महिला झाऱ्याच्या साहाय्याने स्वच्छ प्लेटमध्ये काढताना व्हिडीओत दिसत आहे. त्यानंतर ही महिला या प्लेटमधील चपात्या कशा उत्तमरितीनं तयार झाल्या आहेत, हे व्हिडीओ पाहणाऱ्या दर्शकांना दाखवते. खरंच, तव्यावर भाजलेल्या चपात्या आणि कुकरमध्ये भाजलेल्या चपात्या यामध्ये काहीही फरक नसल्याचं या व्हिडीओतून स्पष्टपणे दिसतं. बॅचलर व्यक्तींना काही ना काही कारणामुळे सतत घरं बदलावी लागतात,त्यामुळे अशा व्यक्तींचा कमी भांडी खरेदी करण्यावर भर असतो. त्यांच्यासाठी चपात्या भाजण्याची ही नवी पध्दत नक्कीच उपयुक्त ठरु शकते. कारण या प्रक्रियेत प्रेशर कुकरच्या माध्यमातून भात,वरण आणि चपातीसुध्दा तयार करता येऊ शकते. ही पाककृती सोशल मीडियावर अनेकांच्या पसंतीस उतरली आहे आणि त्यातील बहुतेक जण चपाती बनवण्यासाठी ही नवी पध्दत वापरतील अशी अपेक्षा आहे.
First published: