मराठी बातम्या /बातम्या /Viral /

भररस्त्यातच महिलेने ट्रॅफिक पोलिसाला जबरदस्तीने केलं Kiss, VIDEO पाहून तुम्हीही व्हाल हैराण

भररस्त्यातच महिलेने ट्रॅफिक पोलिसाला जबरदस्तीने केलं Kiss, VIDEO पाहून तुम्हीही व्हाल हैराण

महिला थेट ट्रॅफिक पोलिसालाच भररस्त्यात जबरदस्तीने किस करू लागली. महिलेचं हे कृत्य पाहून तेथे उपस्थित असणारे सर्वच लोक हैराण होते.

  • Published by:  Karishma

नवी दिल्ली, 25 ऑगस्ट : सोशल मीडियावर (Social Media) असा एक व्हिडीओ व्हायरल (Viral Video) होतो आहे, जो पाहून तुम्हीही हैराण व्हाल. आतापर्यंत अनेकांनी लाच घेतल्याचं समोर आलं आहे. पण एक असं प्रकरण समोर आलं आहे, ज्यात पोलीस कर्मचाऱ्याने लाच घेण्यास नकार दिल्याने त्याला एका वेगळ्याच गोष्टीचा सामना करावा लागला. एका पोलीस कर्मचाऱ्याने लाच घेण्यास नकार दिल्यानंतर एका महिलेने त्याला जबरदस्ती किस करण्याचा प्रयत्न केला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात, पण काही व्हिडीओ पाहून अतिशय हैराण होयला होतं. अशाच या व्हायरल व्हिडीओमध्ये एका गुन्ह्यात पोलिसाने एका महिलेला पकडलं. स्वत: ला सोडवण्यासाठी ती अतिशय प्रयत्न करत होती. पण तिला त्यात यश मिळत नव्हतं. अनेक प्रयत्नांनंतरही तिला यश न आल्याने तिने थेट पोलिसालाच भररस्त्यात जबरदस्तीने किस करू लागली. महिलेचं हे कृत्य पाहून तेथे उपस्थित असणारे सर्वच लोक हैराण होते.

भररस्त्यातला हा व्हिडीओ समोर आला आहे. महिलेच्या कृत्यामुळे रस्त्यांवर ट्रॅफिक, माणसांचीही मोठी गर्दी झाली आहे. व्हिडीओमध्ये दोन ट्रॅफिक पोलीस दिसतात. त्यापैकी एका पोलीसाच्या मागे मागे महिला जाते. ती त्याला खेचत-खेचत पुन्हा रस्त्याच्यामध्ये आणते. त्याच्या खांद्यावर जबरदस्ती हात टाकत, त्याला किस करते.

नवरदेवाची पाठ फिरताच नवरीला...; लग्नात Ex-boyfriend ने काय केलं पाहा VIDEO

हा व्हिडीओ आतापर्यंत अनेकांनी पाहिला असून त्यावर विविध प्रतिक्रिया येत आहेत. अनेकांनी महिलेच्या कृत्यावर रागही व्यक्त केला आहे.

First published:

Tags: Video viral