मराठी बातम्या /बातम्या /Viral /VIDEO : तरुणींनी लग्नात नवरदेवला दिलं विचित्र गिफ्ट; उघडताच मंडपात पिकला हशा

VIDEO : तरुणींनी लग्नात नवरदेवला दिलं विचित्र गिफ्ट; उघडताच मंडपात पिकला हशा

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतं, की नवरदेव आणि नवरी स्टेजवर बसलेले आहेत. इतक्यात स्टेजवर काही मुली येतात.

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतं, की नवरदेव आणि नवरी स्टेजवर बसलेले आहेत. इतक्यात स्टेजवर काही मुली येतात.

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतं, की नवरदेव आणि नवरी स्टेजवर बसलेले आहेत. इतक्यात स्टेजवर काही मुली येतात.

नवी दिल्ली 01 नोव्हेंबर : नवरी आणि नवरदेव स्टेजवर बसलेले असतात तेव्हा पाहुणे त्यांच्यासोबत केवळ फोटोच काढत नाहीत तर त्यांना गिफ्टही (Wedding Gifts) देतात. नवरी आणि नवरदेवाचे काही असेही मित्र-मैत्रिणी असतात जे गिफ्टच्या बाबतीतही मस्करी करतात. कोणालाच माहिती नसतं की या गिफ्ट बॉक्समध्ये नेमकं काय आहे. त्यामुळे हे गिफ्ट उघडण्यासाठी ते स्टेजवरच आग्रह करू लागतात. सोशल मीडियावर (Social Media) सध्या एक असा व्हिडिओ व्हायरल (Viral Video) होत आहे, जो पाहून कोणीही हैराण होईल. स्टेजवरच काही तरुणींनी नवरदेवाला असं सरप्राईज दिलं जे पाहूनच लोक हैराण झाले.

नवरीला हरवण्यासाठी नवरदेवानं केले आटोकाट प्रयत्न; तरीही मानावी लागली हार, Video

हा व्हिडिओ पाहून तुम्हालाही हसू येईल. स्टेजवर असलेल्या नवरदेव आणि नवरीला काही तरुणींनी मजेशीर गिफ्ट दिलं. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतं, की नवरदेव आणि नवरी स्टेजवर बसलेले आहेत. इतक्यात स्टेजवर काही मुली येतात. या मुलींनी नवरदेवाला काहीतरी गिफ्ट दिलं आणि स्टेजवरच ते उघडण्यास सांगितलं.

नवरदेव जेव्हा गिफ्ट उघडत होता तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर हसू होतं आणि उत्सुकताही दिसत होती की अखेर या गिफ्ट बॉक्समध्ये असं काय आहे. यादरम्यान शेजारी बसलेली नवरीबाईदेखील गिफ्टकडे बघत राहिली. नवरदेवानं गिफ्ट उघडताच त्यातून एक छोटी बॅट निघाली. हे पाहून तिथे उपस्थित सगळेच हसू लागले. नवरी आणि नवरदेवदेखील हे अजब गिफ्ट पाहून हसू लागले. तरुणींनी केलेली ही मस्करी सर्वांच्याच पसंतीस उतरली. याच कारणामुळे यूजर्सही या व्हिडिओवर भरपूर कमेंट करत आहेत.

VIDEO - नवरी जोमात नवरा कोमात! नवरीबाईचं ते रूप पाहून नवरदेवाला बसला जोर का झटका

सोशल मीडियावर हा व्हिडिओ लोकांच्या भलताच पसंतीस उतरत आहे. इन्स्टाग्रामवर only_punjabi_suits123456 नावाच्या अकाऊंटवरुन हा व्हिडिओ शेअर केला गेला आहे. हा व्हिडिओ अनेकांनी लाईक केला आहे. हा व्हिडिओ शेअर करत कॅप्शनमध्ये अनेक हॅश्टॅग देण्यात आले आहेत. या व्हिडिओवर इतरही अनेकांनी प्रतिक्रिया दिली आहे.

First published:

Tags: Wedding video