नवी दिल्ली, 25 मे : विमानतळावरील अनेक विचित्र घटना कायम चर्चेत येतात. कधी सामान चोरीला गेलं तर कधी प्रवाशांमध्ये वाद झाला, अशा घटना आणि त्यांचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. अशातच विमानतळावरील आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे, ज्यामध्ये प्रवाशी एकमेकांवर तुटून पडले असून जबरदस्त हाणामारी करत आहे.
नुकताच समोर आलेला व्हिडीओ विमानतळावरील हाणामारीचा आहे. हा व्हिडीओ पाहून आजूबाजूचे लोकही थक्क झाले. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
हा व्हिडिओ अमेरिकेतील शिकागो आंतरराष्ट्रीय विमानतळाचा असल्याचे सांगण्यात येत आहे. हाणामारीचे हे दृश्य सोमवारचे आहे, जेव्हा लोक विमानातून उतरत होते. बॅगेज परिसरात सामान घेताना हाणामारी सुरू झाली. बघता बघता ही भांडणं इतकी वाढली की प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचले. एका 24 वर्षीय महिलेवर दोन लोकांनी हल्ला केला, ज्यांना अटक करण्यात आली. व्हिडीओच्या सुरुवातीला एक माणूस दुसऱ्यावर थैमान घालताना दिसत आहे. इतक्यात हिरव्या रंगाचा टी-शर्ट घातलेला एक व्यक्तीही तिथे पोहोचला. तर काही महिला जमिनीवर पडून एकमेकांचे केस ओढत भांडत आहेत.
Brawl at Chicago O’Hare airport this morning pic.twitter.com/fsH6n3yABd
— Mr Bogus (@Mr_Bogus0007) May 23, 2023
@Mr_Bogus0007 नावाच्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. 53 सेकंदांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर सर्वांचं लक्ष वेधत आहे. या हाणामारीच्या व्हिडीओवर अनेकजण कमेंट करताना दिसत आहे.
दरम्यान, यापूर्वीही विमानतळावरील असे प्रकार समोर आले आहेत. दिवसेंदिवस विमानतळावरील अशा घटना घडण्याचं प्रमाण वाढलं आहे. त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झालं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Airplane, Viral, Viral news, Viral videos