चोरनं दाखवली बंदूक, महिलेनं लादी पुसायच्या मॉबनं धू-धू धुतलं, VIDEO VIRAL

चोरनं दाखवली बंदूक, महिलेनं लादी पुसायच्या मॉबनं धू-धू धुतलं, VIDEO VIRAL

महिलेचं नेटकऱ्यांनी तुफान कौतुक केलं आहे. महिलेच्या धाडसामुळे चोरीचा डाव फसल्याचं नेटकऱ्यांनी म्हटलं आहे.

  • Share this:

मुंबई, 06 ऑगस्ट : बंदुकीचा धाक दाखवून लुटण्यासाठी आलेल्याा तरुणाला एका महिलेनं चांगली अद्दल घडवली आहे. दुकानात घुसलेल्या तरुणाला महिलेनं घाबरून न जाता चांगला चोप दिला. महिलेचा रौद्र रुप पाहून हातात बंदूक असलेला तरुण पळ काढत सुटला.

चोरीच्या हेतून दुकानात वर्दळ नाही हे पाहून एक तरुण घुसतो. हात साफ कऱण्यासाठी तो पैशांच्या गल्ल्याजवळ येतो आणि तेवढ्यात साफसफाई करत असलेली महिला तिथे येते. या महिलेला पाहून चोर बंदुकीचा धाक दाखवतो आणि पैसे काढायची मागणी करतो. चिडलेली महिला मोठं धाडस करून हातातला ओला मॉब त्याच्या डोक्यात घालते. या तरुणाला ती लादी पुसण्याच्या मॉबनं मारहाण करते. या संपूर्ण घटनेचा CCTV व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

हे वाचा-स्विमिंग करण्याआधीचा स्टंट पडला महागात, या तरुणीसोबत काय घडलं, पाहा VIDEO

हे वाचा-...आणि दोन कांगारू एकमेकांना भिडले, दुर्मीळ लढाईचा VIDEO VIRAL

हा व्हिडीओ फेब्रुवारी महिन्यात पोलंड इथला असल्याचं सांगितलं जात आहे. हा व्हिडीओ पुन्हा एकदा तुफान व्हायरल झाला आहे. या महिलेचं नेटकऱ्यांनी तुफान कौतुक केलं आहे. महिलेच्या धाडसामुळे चोरीचा डाव फसल्याचं नेटकऱ्यांनी म्हटलं आहे.

हा व्हिडीओ आतापर्यंत 50 हजारहून अधिक लोकांनी पाहिला आहे. तर 700 हून अधिक लोकांनी लाईक केला आहे. सोशल मीडियावर महिलेच्या धाडसाचं आणि तिने उचललेल्या पावलामुळे चोरी टळल्यानं तिचं कौतुक केलं जात आहे.

Published by: Kranti Kanetkar
First published: August 6, 2020, 2:58 PM IST

ताज्या बातम्या