मुंबई २७ नोव्हेंबर : कुटुंबातील एखाद्याचा मृत्यू झाला तर त्या कुटुंबासाठी यापेक्षा मोठी दुःखद बातमी कोणती असेल? प्रत्येकासाठी आपले नातेवाईक किंवा जवळची लोक प्रिय असतात. पण असं असलं तरी मृत्यू कोणालाही चुकलेला नाही. जो व्यक्ती जन्माला आला आहे, त्याचा मृत्यू देखील अटळ आहे. त्यामुळे प्रिय व्यक्ती देवाघरी गेली तर ती पुन्हा येणार नसते, पण असं असलं तरी ती उठावी आणि आपल्याशी बोलावी, काही तरी चमत्कार व्हावा असं प्रत्येकालाच वाटत असतं.
असंच काहीसं प्रकरण उत्तर प्रदेशातून समोर आलं आहे. जे ऐकून तुम्हाला धक्का बसेल. कारण खरंच हा एक चमत्कार झाला होता.
हे ही वाचा : ती पडली, सरकली आणि अचानक गायब झाली... रस्ता अपघाताचा 'हा' व्हिडीओ ठरला चर्चेचा विषय
उत्तर प्रदेशातील देवरिया जिल्ह्यात राहाणाऱ्या कुटुंबातील एका सदस्याच्या मृत्यूची बातमी समोर आली, हे घरातील प्रत्येकावर दुखाचं डोंगर पडलं. ही माहिती मिळाल्यानंतर कुटुंबातील सदस्यांनी महिलेच्या अंत्यसंस्काराची तयारी सुरू केली, पण दरम्यान ही महिला पुन्हा जिवंत झाली. ज्यानंतर घरात पुन्हा एकदा आनंदाचं वातावरण निर्माण झालं.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
हे प्रकरण गोरखपूरच्या देवरिया जिल्ह्यातील महुआडीह भागातील पोलिस ठाण्याच्या बेलवा बाजार गावचे आहे. येथे राहणाऱ्या ५५ वर्षीय मीना देवी यांना श्वसनाचा गंभीर आजार आहे. त्यांच्या उपचारासाठी त्यांना जवळच्या रुग्णालयात नेले होते.
सोमवारी त्यांची तब्येत बिघडू लागली. त्यानंतर मीना देवी यांना डॉक्टरांनी जिल्हा रुग्णालयात नेण्याचा सल्ला दिला. मीना देवी यांना शुक्रवारी सकाळी दुसऱ्या रुग्णालयात नेण्यात आले. त्यानंतर त्यांना डॉक्टरांनी घरी घेऊन जाण्याचा सल्ला दिला. यानंतर मीना देवीं यांचा मुलगा त्यांना घरी घेऊन गेला. पण असं असताना अचानक आईचा श्वास थांबल्याचे मुलाने घरी सांगितले. ही बातमी ऐकून कुटुंबावर दुखाचं डोंगर कोसळलं.
हे ही वाचा : पहाटे ३ वाजता हॉस्पिटलमध्ये 'भूताची एन्ट्री'? Viral Video पाहून नेटकऱ्यांना फुटला घाम
मुलाच्या या बातमीनंतर कुटुंबियांनी मीनी देवी यांच्या अंत्यसंस्काराची तयारी सुरू केली. जेव्हा त्यांचं शरीर घरी आणण्यात आलं तेव्हा पुन्हा मीना देवी यांचा श्वास सुरु झाला. हे कळताच कुटुंबामध्ये पुन्हा आनंदाचे वातावरण निर्माण झाले.
यानंतर मीना देवी यांना पुन्हा रुग्णालयात नेण्यात आलं. आता त्यांच्यावर उपचार सुरु आहेत आणि त्या एकदम चांगल्या झाल्या असल्याची माहिती त्यांच्या मुलाने दिली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Shocking news, Social media, Top trending, Viral, Viral news