मराठी बातम्या /बातम्या /Viral /

हटके डान्ससोबतच मादक अदा, या 'चंद्रा'च्या डान्सची नेटकऱ्यांना 'नशा', पाहा Video

हटके डान्ससोबतच मादक अदा, या 'चंद्रा'च्या डान्सची नेटकऱ्यांना 'नशा', पाहा Video

व्हायरल व्हिडीओ

व्हायरल व्हिडीओ

यांपैकी काही व्हिडीओ असे असतात जे रातोरात व्हायरल होतात आणि प्रसिद्धीच्या झोतात येतात. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर ट्रेंड होत आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Devika Shinde

मुंबई 1 डिसेंबर : सोशल मीडिया हे असं प्लॅटफॉर्म आहे. जिथे लोक मनोरंजक व्हिडीओ पाहातात. पण त्यासोबतच तुम्ही येथे तुमचे व्हिडीओ किंवा फोटो देखील शेअर करु शकता. खरंतर हे असं माध्यम आहे. जेथून तुम्ही पैसे देखील मिळवू शकता. त्यामुळे लोक प्रसिद्धीसाठी आणि पैसे कमावण्यासाठी या प्लॅटफॉर्मवर आपले वेगवेगळे व्हिडीओ शेअर करत असतात.

यांपैकी काही व्हिडीओ असे असतात जे रातोरात व्हायरल होतात आणि प्रसिद्धीच्या झोतात येतात. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर ट्रेंड होत आहे.

हे ही पाहा : Viral Video : CCTV मध्ये ही घटना कैद झाली नसती तर, तुमचा विश्वासच बसला नसता

हा व्हिडीओ एका महिलेचा आहे, ज्यामध्ये ती डान्स करत आहे. आता तुम्ही म्हणाल की डान्स तर सगळेच करतात. मग यात इतकं वेगळं ते काय? मग तुम्ही एकदा हा डान्स पाहाच.

या महिलेनं चंद्राच्या गाण्यावर डान्स केला आहे. खरंतर हे गाणं सोशल मीडियावरील ट्रेंडिंग गाण्यापैकी एक आहे. या गाण्याने लहानांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच वेड लावलं आहे. पण आता या महिलेच्या गाण्याने देखील लोकांना वेड लागल्याचं पाहायला मिळत आहे.

खरंतर डान्स किंवा लावणी करणारी महिला म्हटलं की ती सडपातळ आणि बारीक असाच लोकांचा समज असतो. पण या महिलेनं स्टिरीओटाईप मोडलं आहे. वजनाचा डान्सशी काहीही संबंध नसतो हे या महिलेनं सिद्ध केलंय.

तिने इतका सुंदर डान्स केलाय की तुम्हाला तो संपेपर्यंत पाहातच राहावासा वाटेल. म्हणून तर या व्हिडीओला एका लाखापेक्षा ही जास्त लाईक्स आले आहेत.

हा व्हिडीओ snazzy.tamilachi या अकाउंटवरुन शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमधील महिलेचं Dhivyaa vikram आहे. ती फॅशनब्लॉगर, डान्सर, कन्टेन्ट क्रिएटर आहे.

First published:

Tags: Social media, Top trending, Videos viral, Viral