Home /News /viral /

'ती' झाली मोटरमन! बंगळुरू ते म्हैसूर चालवली राज्य राणी एक्स्प्रेस, पाहा VIDEO

'ती' झाली मोटरमन! बंगळुरू ते म्हैसूर चालवली राज्य राणी एक्स्प्रेस, पाहा VIDEO

बस ड्रायव्हरपासून ते हवाईदलापर्यंत महिलांनी आपल्या कामगिरीचा यशस्वी ठसा सर्वच क्षेत्रात उमटवला आहे.

    बंगळुरू, 02 मार्च : महिला सक्षमीकरणाला चालना देण्यासाठी महिलांना वेगवेगळ्या संधी उपलब्ध करून दिल्या जात आहेत. अगदी बस ड्रायव्हरपासून ते हवाईदलापर्यंत महिलांनी आपल्या कामगिरीचा यशस्वी ठसा उमटवला आहे. बंगळुरूहून म्हैसूरला जाणारी राज्यराणी एक्स्प्रेस महिलांनी चालवल्याचा हा व्हिडीओ रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांनी ट्वीट केलं आहे. 01 मार्च रोजी महिलांनी एक्स्प्रेस गाडी चालवली. या व्हिडीओला आतापर्यंत 40 हजार लोकांनी पाहिला आहे. "महिला सक्षमीकरणाच्या दिशेने: 8 मार्च आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून, बेंगळुरू ते म्हैसूर दरम्यान राज्यराणी एक्स्प्रेस ट्रेन आज सर्व महिला कर्मचार्‍यांद्वारे चालविली जात आहे. या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकता एक्स्प्रेस गाडी मोटरमन महिला चालवत आहे.'' अशा कॅप्शननं पीयूष गोयल यांनी हा व्हिडीओ ट्वीट केला आहे. या व्हिडीओला आतापर्यंत सोशल मीडियावर 10 हजार लोकांनी पसंत केलं आहे. तर 2 हजारहून अधिक लोकांनी रिट्वीट केलं आहे. सर्व क्षेत्रात आपला यशस्वी ठसा उमटवणाऱ्या महिलांचं युझर्सने कौतुक केलं आहे. 'हम भी किसीसे कम नही' हे महिलांनी दाखवून दिलं. अशी कमेंटही या व्हिडीओवर एका युझरने केली आहे. अनेक युझर्स म्हणाले की ही खरोखरच एक "अभिमानाची गोष्ट'' आहे. याआधी महाराष्ट्रातील जळगावमधील लहान गावातून एका महिलेनं लालपरीचं स्टेअरिंग हातात घेत बस चालवली होती. इंग्लिश स्कूलमधील शिक्षकाची नोकरीसोडून पतीच्या पावलावर पाऊल ठेवत पत्नीनंही परिवहन महामंडळात नोकरी स्वीकारली. दुचाकी चारचाकी नाही तर थेट एसटी चालवण्याचं धाडस त्यांनी केलं. कोणतीही भीती न बाळगता शुभांगी केदार यांनी एसचीचं स्टेअरिंग हाती घेतलं आणि चालवण्यास सुरुवात केली. 28 वर्षांच्या शुभांगी केदार या जळगावच्या आहेत. त्या डीएड झाल्या आहे. लग्नाआधी त्या इंग्लिश मीडियम शाळेमध्ये शिक्षिका म्हणून नोकरी करत होत्या. लग्नानंतर मात्र त्यांनी एसटी महामंडळात नवऱ्यासोबत नोकरी करण्याचा निर्णय घेतला. शुभांगी यांच्यासारख्या जवळपास 162 महिला बसवाहक एसटी चालवण्याचं 365 दिवसांचे ट्रेनिंग असल्याचे त्यांनी सांगितले. हे वाचा-VIDEO : प्रशिक्षकाच्या प्रसंगावधानामुळे वाचली जिमनॅस्टिक करणारी मुलगी
    Published by:Kranti Kanetkar
    First published:

    पुढील बातम्या