मराठी बातम्या /बातम्या /Viral /

बँकेला 5 कोटींचा गंडा, प्लास्टिक सर्जरीकरुन चेहराही बदलला पण एक चुक आणि खेळ खल्लास

बँकेला 5 कोटींचा गंडा, प्लास्टिक सर्जरीकरुन चेहराही बदलला पण एक चुक आणि खेळ खल्लास

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

या महिलेची कहाणी तेव्हा सुरू झाली जेव्हा या महिलेने त्याच पैशातून तिची प्लास्टिक सर्जरी करून तिचा चेहरा पूर्णपणे बदलून टाकला.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Devika Shinde

मुंबई 23 जानेवारी : बँकेत चोरी झाल्याची किंवा दरोडा घातल्याच्या अनेक बातम्या तुम्ही ऐकल्या असतील. ज्यामध्ये दरोडेखोर एक प्लानिंग आखून पैसे चोरतात. पण कधी बँकेच्या कर्मचाऱ्याने चोरी केल्याचं तुम्ही ऐकलंय का? असंच एक प्रकरण समोर आलं आहे. जे ऐकून सर्वांनाच धक्का बसला आहे.

खरंतर बँकेत कर्मचारी असलेल्या महिलेनं आपल्याच बँकेत फ्रॉड केला आणि पळून गेली. जवळ जवळ 25 वर्ष पोलीस या महिलेच्या शोधात होते. अखेर 25 वर्षानंतर ती पकडली गेलीच.

आता तुम्ही म्हणाल की नेमकं काय झालं असावं, कारण जर ती व्यक्ती इतक्या वर्षापासून पकडली गेली नाही, मग आता अचानक काय घडलं? तर एक छोटी चुक महिलेला महागात पडली ज्यामुळे पोलिसांच्या हाती ती लागलीच.

हे ही पाहा : Shocking secrets : हा फोटो साधा नाही.... याचं सत्य जाणून तुम्हाला धक्का बसेल

वास्तविक, ही घटना चीनमधील एका शहरातील आहे. चिनी मीडिया रिपोर्ट्सनुसार, या महिलेचे नाव चेन येले असून ती चीनच्या सरकारी बँकेत लिपिक म्हणून काम करत असताना अचानक गायब झाली. नंतर कळले की त्या बँकेत चोरी झाली आहे. ज्यानंतर संपूर्ण प्रकरण या महिलेनं घडवून आणल्याचं लक्षात आलं. या बेपत्ता झालेल्या महिला बँकेच्या क्लार्कने त्या बँकेतील सुमारे 5 कोटी रुपयांची चोरी केली आहे.

इतकेच नाही तर त्या महिलेची कहाणी तेव्हा सुरू झाली जेव्हा या महिलेने त्याच पैशातून तिची प्लास्टिक सर्जरी करून तिचा चेहरा पूर्णपणे बदलून टाकला. जेणेकरुन तिला कोणीही ओळखू शकणार नाही.

यानंतर तिने एक घर खरेदी करून आरामदायी जीवन जगण्यास सुरुवात केली. तिने काही पैसे एका बिजनेसमध्ये टाकले आणि उरलेले पैसे भावा-बहिणीच्या खात्यात ट्रान्सफर केले.

दुसरीकडे तपास अधिकारी बराच वेळ या बँकेच्या चोरी प्रकरणात होतेच. अहवालानुसार, असे करताना 25 वर्षांचा काळ गेला. दरम्यान, महिला आरोपीचेही लग्न झाले. मात्र अलीकडेच काही काळापूर्वी या महिलेने या प्रकरणाच्या तपासात सहभागी असलेल्या अधिकाऱ्याला धक्काबुक्की केली. अधिकाऱ्याला या महिलेचा संशय आल्याने त्यांनी जाऊन टीमला माहिती दिली आणि महिलेला पकडले.

हे ही पाहा : एक चाकाच्या बाईकवर दाखवला खतरनाक स्टंट, पण पुढच्याच क्षणी मृत्यूशी भेट, Video Viral

सुरुवातीला महिला हे मान्य करत नव्हती, पण जेव्हा तिच्याविरुद्धचे सर्व पुरावे समोर आले तेव्हा तिला आपला गुन्हा मान्य करावाच लागला. यानंतर त्या महिलेने अनेक धक्कादायक गुपितेही उघड केली. तिने ही चोरी कशी केली आणि दुसऱ्या दिवशी संपूर्ण कुटुंबासह गायब कशी झाली हेही सगळं तिने सांगितले. सध्या महिलेला पकडून तुरुंगात टाकण्यात आले आहे.

First published:

Tags: Money, Money fraud, Shocking, Top trending, Viral, Women