आईसाठी नवरा हवा आहे; निर्व्यसनी असावा आणि...; वाचा मुलीची Viral पोस्ट

आईसाठी नवरा हवा आहे; निर्व्यसनी असावा आणि...; वाचा मुलीची Viral पोस्ट

आस्था आईचं आयुष्य पुन्हा एकदा रुळावर आणण्यासाठी आणि तिच्या आयुष्यात रंग भरण्यासाठी जे प्रयत्न करत आहे त्याचं सर्व स्थरांवरून कौतुक होत आहे.

  • Share this:

काही वर्षांपूर्वीपर्यंत आई- वडील आपल्या मुलांसाठी योग्य वर आणि वधू शोधायचे. त्यासाठी ते विवाह संस्थेत नाव नोंदवायचे किंवा अगदीच वृत्तपत्रात जाहिरातही देत होते. पण आता जग बदललंय.. याचं उत्तम उदाहरण म्हणजे एक मुलगी ट्विटरवर तिच्या आईसाठी नवरा शोधत आहे. तिच्या ट्वीटवरून स्पष्ट होतं की आताची पिढी ही आई- वडील आणि त्यांच्या आयुष्याबद्दलही अधिक सजग असतात. काही वर्षांपूर्वी अशा गोष्टींचा विरोध केला जायचा आता याला प्रोत्साहन दिलं जात आहे.

ट्विटरवर आस्था वर्मा नावाच्या मुलीने आईसोबतचा फोटो शेअर करत म्हटलं की, 'माझ्या आईसाठी 50 वर्षीय हँडसम नवऱ्या मुलाच्या शोधात आहे. शक्यतो तो शाकाहारी असावा आणि मद्यपान करणारा नसावा.' यासोबतच आस्थाच्या प्रोफाइलबद्दल बोलायचे झाले तर तिने ट्विटरवर स्वतःला कवियत्री, राजकीय निरीक्षक आणि नेल आर्टिस्ट म्हटलं आहे. आस्थाने आईसोबतचा जो फोटो शेअर केला त्यात आईने गुलाबी रंगाचा पंजाबी ड्रेस घातला होता.

आस्था आईचं आयुष्य पुन्हा एकदा रुळावर आणण्यासाठी आणि तिच्या आयुष्यात रंग भरण्यासाठी जे प्रयत्न करत आहे त्याचं सर्व स्थरांवरून कौतुक होत आहे. असं असलं तरी काही लोकांनी तिची टेरही खेचली. आस्थाच्या या ट्वीटला आतापर्यंत 4 हजार रिट-ट्वीट मिळाले असून 18 हजारांहून अधिक लाइक्स मिळाले आहेत.

जगातील सर्वात जास्त प्रदूषण पसरवणाऱ्या टॉप 5 कंपन्या, भारतातील या कंपनीचंही नाव

जाऊ तिथं कचरा करू; अमेरिकेत दिवाळीला रस्त्यावर उडवले फटाके, आणि...

डॉक्टरांकडे जाण्याची गरज नाही; 'या' उपायांनी दूर होईल घशातील खवखव

गिनीज बुकमध्ये तिरंग्याचा दबदबा; 80हून अधिक भन्नाट रिकॉर्ड भारतीयांच्या नावावर!

रॅम्प वॉक करताना पाकिस्तानी मॉडेल अडखळली आणि...; पाहा हा Viral Video

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 1, 2019 05:13 PM IST

ताज्या बातम्या